Home latest News अन्न नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

अन्न नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा.

81

अन्न, नागरी पुरवठा मंत्री, छगन भुजबळ यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

जिजा गुरले✍
चंद्रपूर ग्रामीण प्रतिनिधी
9529811809

चंद्रपूर दि.16ऑक्टो:-  महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक मंत्री, छगन भुजबळ हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 18 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता मूल येथे आगमन व कर्मवीर म.सा. कन्नमवार सभागृह,मुल येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मेळाव्यास उपस्थित. सायंकाळी 6 वाजता मूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र कार्यालयाचे उद्घाटन. सायंकाळी 6.30 वाजता मोटारीने चंद्रपूरकडे प्रयाण. सायंकाळी 7.30 वाजता औष्णिक विद्युत केंद्र विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

मंगळवार दि. 19 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता औष्णिक विद्युत केंद्र विश्रामगृह येथे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची बैठक. सकाळी 10:30 वाजता जयंत टॉकीज जवळ, राजीव गांधी सभागृह येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मेळाव्यास उपस्थित. दुपारी 1 वाजता (स्थळ- जनता कॉलेज, सिव्हील लाईन,चंद्रपूर) वेळ राखीव. दुपारी 2 वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण.