हिंगणघाट भूखंड झाला श्रीखंड, देवी देवताच्या नावावर लेआउटचे नाव ठेऊन लोकांची फसवणुक.

101

हिंगणघाट भूखंड झाला श्रीखंड, देवी देवताच्या नावावर लेआउटचे नाव ठेऊन लोकांची फसवणुक.

हिंगणघाट भूखंड झाला श्रीखंड, देवी देवताच्या नावावर लेआउटचे नाव ठेऊन लोकांची फसवणुक.
हिंगणघाट भूखंड झाला श्रीखंड, देवी देवताच्या नावावर लेआउटचे नाव ठेऊन लोकांची फसवणुक.

मुकेश चौधरी✒
उपसंपादक, मिडिया वार्ता न्युज
हिंगणघाट :- वर्धा जिल्हातील हिंगणघाट तालुक्यात बाहेर जिल्हातून येऊन हिंदु देवी देवताचे नाव ठवुन अवैध लेआऊट भूमाफिया मोठ्या प्रमाणात सक्रीय असल्याचे दिसून येते आहे. हे जमीन माफिया शेतक-या जवळून कृषक शेती घेऊन शासनाची कुठलिही परवागी न घेता अवैध रित्या लेआउट वर प्लाट टाकुन सरास पणे विक्री करत असल्याची महिती मिडिया वार्ता न्युजला मिळाली आहे.

हिंगणघाट तालुक्यातील नंदोरी रोडवर असलेल्या कळाजना जवळ मौजा पिंपळगावच्या हद्दीत जालना जिल्हातील पारख लॉन्डस अण्ड डेव्हलपर्स या भुमाफीया बिल्डरने हिंदु देवी श्री वैष्णवदेवीच्या नावाने अवैध लेआऊट टाकुन त्याने हिंगणघाट तालुक्यामधील हिंदु समाजाच्या सामान्य जनतेची फसवणुक सुरु केली असुन शासन आणि प्रशासन मुग गिळुन गप्प असल्याचे चित्र सध्या तरी बघायला मिळत आहे. यात अवैध लेआऊट मधून भष्ट्र अधीकारी यांचे आर्थिक हित झाल्याचे चर्चा हिंगणघाट मध्ये सुरु आहे. या अवैध लेआऊट आणि भष्ट्र अधीका-यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करित आहे.

बाहेर जिल्हातुन येऊन पारख या भु माफियाने हिंगणघाट मध्ये श्री वैष्णवदेवीच्या नावाने लेआऊट मध्ये प्लाट टाकुन आपल्या कार्यालयाच्या बोर्ड वर नकली एन.ए, टी.पी आणि शासनाची परवानगी दाखवुन सरास पणे प्लाट विकुन नागरीकांन जवळून लाखो रुपये घेतले आहे. परंतु त्या लेआउट ला शासनाची परवागी नाही. एन.ए.टी.पी झालेलेच नाही. त्या लेआऊट मध्ये कुठलेही विकास कार्य पण करण्यात आले नाही.

प्लाट घेऊन लोक जंगलात राहायला मजबुर.

आपल्या हक्काच घर व्हाव अस स्वप्न सर्वाच असते. त्याच्याच फ़ायदा पारख या भुमाफिया अवैध बिल्डर घेत आहे. त्यामूळे श्री वैष्णवदेवी लेआऊट मध्ये कुठलेही विकास कार्य करण्या अगोदरच अवैध प्लाटची विक्री करत असुन त्या लेआउट मध्ये साधे रस्त्ये, पाण्याची व्यवस्था, सांडपाणी वाहण्याची व्यवस्था, पार्क साठी राखीव जागा, इलेक्ट्रीक पोल आणि इतर मुलभुत सोय करण्यात आलेली नाही. त्यामूळे त्या लेआउट मध्ये मोठ्या प्रमाणात जंगल वाढले आहे. आणि परिवार तिथे रहायला मजबुर आहे.

उपवीभागीय अधिकारी अवैध बिल्डरवर करणार काय कारवाई.

पारख या भुमाफीया कडुन स्थानिक हिंगणघाट मधील लोकांची सुरु असलेली फसवणुक प्रशासनाची भुमीका संशायपद आहे. कुठे तरी पाणी मुरत असल्यामुळेच बिल्डर बाहेर जिल्हातून येऊन स्थानिक हिंगणघाटकराना फसवत आहे. हिंगणघाट येथील उपविभागीय अधिकारी यांनी असा अवैध लेआऊट वर कारवाई करावी अशी मागणी हिंगणघाट मधील नागरिक करित आहे.