Home latest News पिकांची पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी गोंडपिपरी तालुक्यातील घडोली गावचे सरपंच...

पिकांची पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी गोंडपिपरी तालुक्यातील घडोली गावचे सरपंच हेमराज चौधरी यांनी तहसील दारांना दिले निवेदन.

71

पिकांची पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी

गोंडपिपरी तालुक्यातील घडोली गावचे सरपंच हेमराज चौधरी यांनी तहसील दारांना दिले निवेदन.

पिकांची पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी गोंडपिपरी तालुक्यातील घडोली गावचे सरपंच हेमराज चौधरी यांनी तहसील दारांना दिले निवेदन.
पिकांची पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी
गोंडपिपरी तालुक्यातील घडोली गावचे सरपंच हेमराज चौधरी यांनी तहसील दारांना दिले निवेदन.

राजेंद्र झाडे
गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी – तालुक्‍यातील समस्त शेतकऱ्यांनी खरीप हंगामात लागवड केलेल्या भात पिके तसेच सोयाबीन,कापूस व तुर इत्यादी पिकाला परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला असल्याने तालुक्यातील शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून त्यांच्या झालेल्या पिकांची तात्काळ चौकशी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी घाडोली चे सरपंच हेमराज चौधरी यांनी तहसील दारांना निवेदाद्वारे केली आहे.
तालुक्यातील शेतमजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई असतानाही खरीप हंगामातील सोयाबीन, वाल, मूग, उडीद, चवळी, भेंडी, पिकासह भातपिकाची लागवड शेतकऱ्यांनी स्वत: शेतात राबून केली होती. तर या पिकांना सुरूवाती पासूनच पोषक असे वातावरण मिळाल्याने पिके जोमदार आली होती,त्यामुळे या वर्षी भरघोस असे उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्याला होती. परंतु भात काढणी सुरुवात होताच पावसाने जोरदार सुरुवात केली असल्याने निसवणीस आलेल्या व काढणी आलेल्या भात पिकाच्या ओंब्या गळून पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
तर सोयाबीन पिकाची काढणी करून शेतात पाण्यात भिजल्याने पीक वाया जाणार आहे, या भितीने शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची मळणी केली असली तरी सोयाबीनचे दाणे काळसर पडले आहेत.कापसाचे बोंड गळून पडले,फुटलेला कापूस पाण्यात सापडल्याने काळा पडला आहे.अश्या विवंचनेत आणि राक्षशी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना माय बाप सरकार तारणार काय..?