मिडिया वार्ता न्युज न्याय हक्काच्या बुलंद आवाज.

46

मिडिया वार्ता न्युज न्याय हक्काच्या बुलंद आवाज.

मिडिया वार्ता न्युज न्याय हक्काच्या बुलंद आवाज.
मिडिया वार्ता न्युज न्याय हक्काच्या बुलंद आवाज.

प्रशांत जगताप
कार्यकारी संपादक
मिडिया वार्ता न्यूज

चंद्रपूर : -कुठल्याही वृत्तपत्राची मदार ही बातमी आणि बातमीदारी यावर असते. पत्रकारिता क्षेत्रात सत्य, प्रामाणीक पणा न्याय हक्का साठी लढण्याची जिद्द असली की, त्याला जन सामान्यात लोकप्रिय व्हायला वेळ लागत नाही. देशात जो पर्यंत चौथा स्तंभ मजबुत कुठलीही सरकार हिटलर शाही करु शकत नाही.

कुठलिही घटना जशी घडलीय, ती तशीच वाचकवर्गा पर्यंत पोहोचवणं, हे वृत्तपत्रांचं काम असतं. अट एकच, ती म्हणजे त्या प्रत्येक बातमीतील माहिती शत-प्रतिशत सत्य आणि प्रामाणीक असावी. बातमीला आणि त्यातील शब्दांना जिथे सत्याची धार मिळते, असे वृत्तपत्र म्हणजे मुंबई प्रसिद्ध होणारे साप्ताहिक “मिडिया वार्ता न्युज” आणि ‘मिडिया वार्ता न्युजची लेखणी’ म्हणजे गोर, गरीब, बेरोजगार, शेतकरी, महिला, तरुणाचा बुलंद आवाज. जो सदव अन्यायावर प्रहार करत आहे.

मुख्य संपादक भागुराम सावंत यांचे वृत्तपत्र म्हणजेच ‘मिडिया वार्ता न्युज’ या ओळखीनं सुरू झालेलं हे वृत्तपत्र, आता नावाजलेल्या वृत्तपत्रांच्या यादीत आपलं नाणं खणखणीत वाजवत दिमाखात तळपत आहे. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात, जिथे प्रत्येकाच्या तळहातात क्षणाक्षणाला ब्रेकिंग न्यूज उपलब्ध आहे, अशा काळातही वृत्तपत्र सुरू ठेवणं, ही मोठी कसरतच असते. देशात आलेल्या कोरोना महामारीच्या लाटेतही मिडिया वार्ता न्युजच्या लेखणीच्या शब्दांची धार तशीच राहिली. हे केवळ आणि केवळ मुख्य संपादक भागुराम सावंत मुंबई, मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ मनोज खोब्रागडे चंद्रपुर, उप संपादक मुकेश चौधरी हिंगणघाट, युवराज मेश्राम नागपुर, मनोज कांबळे नालासोपारा, संतोष मेश्राम राजुरा, त्रीशा राऊत चिमुर, सौ. हनीशा दुधे बल्लारपुर, डॉ. भोलानाथ मेश्राम जीवती, गुणवंत कांबळे मुंबई, आशिष अंबादे वर्धा, प्रा. अक्षय पेटकर वर्धा ,कृष्णा वैद्य, धनराज वैरागडे, राजेंद्र झाडे,अरुण भोले, संदिप तुरक्याल, जिजा गुरले, हेमा मेश्राम,  यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच शक्य झालं. ‘तुम्ही काम करा, मी तुमच्या पाठीशी आहे,’ हा सावंत साहेबांनी दिलेला विश्वास ‘मिडिया वार्ता न्युज’साठी प्रेरक ठरला. त्यामुळे ‘मिडिया वार्ता न्युज’चा प्रत्येक सदस्य जीव ओतून काम करू लागला आणि त्यामुळेच आज ‘मिडिया वार्ता न्युज’ 6व्या वर्षांत शानदार प्रवेश करत आहे. तसंच, ‘मिडिया वार्ता न्युज’ साप्ताहिक वृत्तपत्र आणी ऑनलाइन पोर्टलला लाभलेला वाचकांचा आशीर्वाद, हेही कारण ‘मिडिया वार्ता न्युज’ला प्रगतीकडे घेऊन जाणारे आहे.

आज देशातील अनेक वृत्तपत्र न्युज चैनल हे सरकारच्या ताटा खालचे मांजर झाल्याची ओरड जनते मधून येत असते. आज पण मिडिया वार्ता न्युज सर्व सामान्य नागरिकांच्या हक्काचा आवाज बुलंद करुन त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडत आहे. शेतकरी आंदोलन असो की, महिला सुरक्षेचा प्रश्न असो, की, भष्ट्राचार असो, तेल दर वाढ, महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य, निवारा असे प्रश्न नेहमी मुख्य संपादक सावंत साहेब आणि मिडिया वार्ता न्यूज उचलुन धरत आले आहे.

आज देशात आणि महाराष्ट्र राज्यात रोज अनेक काहीना काही घटना घडत असतात. त्यांचे सकारात्मक तथा नकारात्मक परिणाम जनसामान्यांवर नियमित होतच असतात. त्या घटनांबाबत व त्यांच्या परिणामांबाबत प्रत्येकाच्या मनात काही ना काही भावना असतातच. याच भावना व्यक्त करण्याची हक्काची जागा म्हणजे ‘मिडिया वार्ता न्युज’ दर आठवड्याला घडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेबाबत वाचकांना काय वाटते, याबाबतची मतमतांतरे जाणून घेत घेत, मिडिया वार्ता न्युज हे दर सोमवार ला आपले सप्ताहीक वृत्तपत्र प्रकाशीत करत असतो. आणि ते वाचकांपर्यंत आपले प्रतिनिधी मार्फत पाठवले जाते. या मागचा हेतु वाचकांनी आपल्या परिसरातील घटनेबाबतच्या आपल्या मनातील भावना नि:संकोचपणे व्यक्त कराव्यात, असा यामागील उद्देश असतो. या आवाहनाला वाचकांचा लाभणारा प्रतिसाद अक्षरश: थक्क करणारा आहे. कधी कधी तर येणाऱ्या प्रतिक्रिया इतक्या जास्त आणि समर्पक असतात की, त्या प्रकाशित करण्याला वृत्तपत्रात जागा ऊपलब्ध नसते. कारण ‘मिडिया वार्ता न्युज’ साठी प्रत्येक वाचक महत्त्वाचा आहे.

रस्त्यांवरचे खड्डे ही समस्या राज्यभरासाठी ‘वैश्विक’ आहे. शहर कोणतंही असो, गाव कोणताही असो, रस्ता तिथे खड्डा हे समीकरण जुळलं नसेल तरच नवल. रस्त्यांची चाळण करणाऱ्या या खड्ड्यांना नेमकं कोण जबाबदार, असं विचारल्यावर प्रत्येक वाचकांनी व्यक्त केलेला राग कोणत्याही सरकारला खडबडून जागं करण्यास पुरेसा होता. तसंच, महिला अत्याचारांबाबत ‘मीडिया वार्ता न्युजच्या व्यासपीठ ’वर प्रतिक्रिया व्यक्त करताना वाचकांचा संताप अमाप होता. वाचकांच्या मतातील प्रत्येक शब्दाला असलेली सत्याची धार त्यानिमित्ताने सरकारलाही जाणवली असेल. एकूणच वाचक हाच प्रत्येक वृत्तपत्राचा खरा कणा असतो. याच वाचकाला ‘मिडिया वार्ता न्युज’ मध्ये प्रत्यक्ष सहभागी करण्याची सोय असणारं ‘मिडिया वार्ता न्युज’ हे सदर वृत्तपत्र आणि ऑनलाइन पोर्टल त्यामुळेच महत्त्वाचं आणि वेगळं ठरतं.