वर्धा इथे विमानतळ उभारण्यात यावे डाॅ उमेश वावरे ( वैज्ञानिक) यानची मागणी…

✒आशीष अंबादे ✒
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8888630841
मिडीया वार्ता न्यूज वर्धा
वर्धा २६/१०/२१ शहर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बिंदू होते. इथे महात्मा गांधी व विनोबा भावे याच्या प्रेरणेने पावन झालेली भुमी आहे.
येथे प्रर्यटना साठी देशी व विदेशी प्रर्यटक गांधी आश्रम. विनोबा भावे आश्रम. विश्व शाती स्तुप. गीताई मंदिर. बघण्याकरीता मोठया प्रमाणात
येतात.व आंतरराष्ट्रीय हिंन्दी विश्वविद्यालय शिक्षण घेण्यासाकरीता देश- विदेशातून विघार्थि येतात.
वर्धा व हिंगणघाट हे व्यापार करण्याचे मोठे दळणवळण केंद्र आहे.
येथील व्यापारी मोठा प्रमाणात मुंबई. हैद्राबाद. चैनई. बेगलूर. गुजरात. उत्तर प्रदेश. मध्य प्रदेश. प्र बंगाल. केरळ इत्यादी व्यापार करण्याचे उघोगपतीला व्यापार करण्यासाठी विमान सेवा हि महत्वाची ठरते त्यामुळे वर्धा इथे विमानतळाची मोठी आवश्यकता आहे.
स्थानिक खासदार. आमदार. व केंद्रीय मंत्री यांनी शिफारस केल्यास विमानतळ सहज शक्य आहे.
या सुविधा मुळे विशेष रूग्णाकरीता मोठा लाभ होईल. तसेच शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होईल. करीता लवकर दखल घ्यावी..डाॅ उमेश वावरे (वैज्ञानिक ) यानच्या नेतृत्वात मा. जिल्हा अधिकारी वर्धा मार्फत. मा.श्री.नरेंद्र मोदी प्रधानमंत्री भारत सरकार..मा. नगर विमान मंत्री भारत सरकार. मा.उध्दवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य..याना निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी मनीष कांबळे. मनोहर भगत. राष्ट्रपाल भालशंकर. जिवन उरकुडे. प्रणय पाटील. नुतन राठोड. देवेंद्र त्रिपल्लीवार. प्रदिप मानिकपूरे. प्रफुल्ल वाघाडे. प्रफुल्ल उईके हे उपस्थित होते…