रेती तस्करी संदर्भात राजुरा शिवसेनेचे तहसीलदार व वन अधिकाऱ्याला निवेदन* *अवैधरित्या होणारी रेती चोरी वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन :- शिवसेना जिल्हा प्रमुख सन्दीप गिरे शहर प्रमुख निलेश गंपावार*

46

*रेती तस्करी संदर्भात राजुरा शिवसेनेचे तहसीलदार व वन अधिकाऱ्याला निवेदन*

*अवैधरित्या होणारी रेती चोरी वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन :- शिवसेना जिल्हा प्रमुख सन्दीप गिरे शहर प्रमुख निलेश गंपावार*

रेती तस्करी संदर्भात राजुरा शिवसेनेचे तहसीलदार व वन अधिकाऱ्याला निवेदन* *अवैधरित्या होणारी रेती चोरी वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन :- शिवसेना जिल्हा प्रमुख सन्दीप गिरे शहर प्रमुख निलेश गंपावार*
रेती तस्करी संदर्भात राजुरा शिवसेनेचे तहसीलदार व वन अधिकाऱ्याला निवेदन*
*अवैधरित्या होणारी रेती चोरी वाहतूक थांबवा अन्यथा आंदोलन :- शिवसेना जिल्हा प्रमुख सन्दीप गिरे शहर प्रमुख निलेश गंपावार*

खुशाल सूर्यवंशी
राजुरा शहर ग्रामीण
प्रतीनीधी
8378848427

राजुरा : -तालुक्यातील नलफडी विहीरगाव, खांबाला, कापणगाव लगत असलेल्या नाल्यामध्ये रात्री बेरात्री अवैध रित्या रेती चोरी वाहतूक चालू आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना येजा करायला नाहक त्रास होत असून घाटात केलेल्या खोदकामुळे निर्माण झालेल्या खड्यामध्ये शेतकरी व त्याची पत्नी आणि बैलगाडी बुडून मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. परिसरात अश्याप्रकारे रेती तस्करी वाहतूक अशीच चालू राहली तर नागरिकांना याचा मोठा त्रास होईल आणि परिणामता शासनाचा महसूल बुडेल.
या पार्शवभूमीवर परिस्थिती लक्षात घेऊन आज राजुरा शहर शिवसेनेच्या वतीने तहसीलदार राजुरा वनअधिकारी राजुरा यांना निवेदन देण्यात आले.
या संबंधी त्वरित कार्यवाही करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे, राजुरा तालुका प्रमुख वासुदेव चापले, राजुरा शहर प्रमुख निलेश गंपावार, धोपताला त मु अध्यक्ष रोहित नलके, समीर शेख, कुंदन येरमे, राजूभाऊ मडावी, आशिष नुती, समीर बेढा, रोहन करगल, शानू शेख, शिवम नलके आणि कार्यकर्ते उपस्थित होते