गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के*

50

*गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के*

गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के*
गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात भूकंपाचे सौम्य धक्के*

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी -चंद्रपूर जिल्हयातील गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात भुकंपाचे सौम्य धक्के जानवले.तालुक्यातील घडोली ,गोंडपिपरी शहरातील साई नगरी येथिल अनेकांना धक्के जानवले.अचानक जानवलेल्या धक्क्यामुळे नागरिक घाबरले.बातमी लिहेपर्यंत जिवित अथवा मालमत्तेचा कुठल्याच नुकसानीची माहीती समोर आली नाही.
गोंडपिपरी तालुक्यातील काही गावात रविवारला 6.48 वाजताचा सूमारास भुकंपाचे धक्के जानवले.यामुळे नागरिक धास्तावले.अनेकांनी घराबाहेर येवून मोकळ्या जागेत आसरा घेतला.तालुक्यातील घडोली,साई नगरी येथे भुकंपाचे धक्के जानवले.गोंडपिपरी तालुक्याप्रमाणेच अहेरी उपविभागातील काही गावात भुकंपाचा धक्याची तिव्रता अधिक होती.महाराष्ट्रातील अहेरी,गोंडपिपरी आणि तेलंगणा मधील बेल्लमपल्ली, आदिलाबाद आदी भाग भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. अहेरी उपविभागातील आष्टी, अहेरी, आलापल्ली, रेपनपल्ली, कमलापूर, जिमलगट्टा, गोविंदगाव,बोरी, राजाराम,गोंडपिपरी तालुक्यातील घडोली,साई नगरी येथा भूकपांचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरातील नागरिक बाहेर आल्याची माहिती देण्यात आली.