गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच खरा दीपोत्सव. – राहुल चव्हाण. – नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दीपोत्सव उपक्रम साजरा. – बापूनगर जुना आदिवासी कोलाम गुड्यावर साजरी केली भेटवस्तू व फराळ साहित्य देऊन दिवाळी.

49

गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच खरा दीपोत्सव. – राहुल चव्हाण.
– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दीपोत्सव उपक्रम साजरा.
– बापूनगर जुना आदिवासी कोलाम गुड्यावर साजरी केली भेटवस्तू व फराळ साहित्य देऊन दिवाळी.

गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच खरा दीपोत्सव. - राहुल चव्हाण. - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दीपोत्सव उपक्रम साजरा. - बापूनगर जुना आदिवासी कोलाम गुड्यावर साजरी केली भेटवस्तू व फराळ साहित्य देऊन दिवाळी.
गोरगरिबांच्या चेहऱ्यावरील हास्य हाच खरा दीपोत्सव. – राहुल चव्हाण.
– नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचा दीपोत्सव उपक्रम साजरा.
– बापूनगर जुना आदिवासी कोलाम गुड्यावर साजरी केली भेटवस्तू व फराळ साहित्य देऊन दिवाळी.

संतोष मेश्राम✍
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
( ग्रामीण )-9923497800

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा राजुरा तर्फे राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन डोंगरगाव परिसरातील बापूनगर जुना कोलाम आदिवासी गुड्यावर दीपोत्सव 2021 अंतर्गत ब्लँकेट,कपडे, टॉवेल, दिवाळी फराळ, बिस्किट आदींचे वाटप करून दीपोत्सव उपक्रम साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विरूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हाण यांची उपस्थिती होती. नेफडो संस्थेने गोरगरिबांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करून त्यांच्या सोबत ऐन दिवाळीच्या दिवशी भेटवस्तू देऊन खऱ्याअर्थाने दीपोत्सव साजरा केला. आपल्या सामाजिक दायित्वातुन माणसांने माणसांशी माणसासम वागणे हाच उद्देश ठेवून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे असे प्रतिपादन वीरूर स्टेशनचे ठाणेदार राहुल चव्हान यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नेफडो चे नागपूर विभाग अध्यक्ष बादल बेले, जुना कोलाम आदिवासी गुड्याचे सोमा भीमा आत्राम, पोलीस स्टेशन वीरूर चे दिवाकर पवार, नेफडो चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, राजुरा तालुका अध्यक्ष संतोष देरकर, अल्का सदावर्ते, तालुका उपाध्यक्ष दिलीप सदावर्ते, रजनी शर्मा आदींची उपस्थिती होती. यावेळी आदिवासी कोलाम गुड्यावरील व अन्य अश्या पॅंचेवीस कुटुंबाना ब्लॅंकेट, कपडे, टॉवेल, दिवाळीचा फराळ, बिस्कीट किट आदींचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहनदास मेश्राम यांनी केले. प्रास्ताविक अल्का सदावर्ते यांनी तर आभार प्रदर्शन बादल बेले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता मनोज तेलीवार, सुनैना तांबेकर, राजश्री उपगन्लावार, भास्कर करमरकर, सुनिता कुंभारे, वीणा देशकर, संगीता पाचघरे, विलास कुंदोजवार, सर्वानंद वाघमारे, नरेंद्र देशकर, उमेश लढी, बबलू चव्हाण, आशिष करमरकर, संदीप पोगला, संदीप आदे,अल्का गंगशेट्टीवार, अविनाश दोरखंडे, सचिन मोरे, गौरव कोडापे, धनराज उमरे, अभिषेक बाजूजवार, विजय पचारे, अमर पचारे, उत्कर्ष गायकवाड, सुवर्णा बेले, प्रेरित सदावर्ते, अबोली सदावर्ते, राधा दोरखंडे, स्वाती मेश्राम आदिसह अनेक नेफडो सभासदानी अथक परिश्रम घेतले. या उपक्रमाकरिता अनेकांनी तन-मन-धनाने सहकार्य करून उपक्रम यशस्वी केला.