दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत आष्टी पोलिसांची कारवाई.

56

दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत आष्टी पोलिसांची कारवाई.

दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत आष्टी पोलिसांची कारवाई.
दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177 

गोंडपिपरी:- आष्टी चंद्रपूर मार्गावरील आष्टी चेक पोस्ट नाक्यावर आष्टी पोलिसांनी नाकाबंदी करून वाहणाची तपासणी केली असता एका चार चाकी बोलेरो वाहणात 3 लाख 10 हजार रुपये किंमतीची देसी दारू व दारू तस्करी साठी वापरण्यात आलेली 4 लाख रुपये किंमतीची बोलेरो वाहण असे एकूण 7 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आष्टी पोलिसांनी दिवाळीच्या रात्री जप्त केली या प्रकरणी दोन दारू तस्करांना अटक केली तर दोन फरार झाले आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

दारूसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत आष्टी पोलिसांची कारवाई.

दिवाळीच्या पर्वावर चंद्रपूर जिल्हातुन आष्टी परीसरात मोठ्या प्रमाणात अवैध रीत्या दारू तस्करी होत असल्याने आष्टी पोलिसांनी चंद्रपूर मार्गावरील आष्टी चेक पोस्ट नाक्यावर नाकाबंदी करून वाहणाची कसून तपासणी केली जात होती दरम्यान काल रात्री च्या सुमारास एम एच 33 वी 7151 या क्रमांकाचे बोलेरो वाहणाची पोलिसांनी तपासणी केली असता वाहणात 3 लाख रुपये किंमतीची देशी दारूचे 50 बाॅक्स आढळून आले तर दारू तस्करी साठी वापरण्यात आलेली बोलेरो किंमत 7 लाख असे एकूण 7 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले या प्रकरणी दोघांना अटक केली असून दोन आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत फरार आरोपीचा शोध आष्टी पोलीस घेत आहेत. आरोपी विरोधात आष्टी पोलीस स्टेशन म.दा.का. 65 अ 83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई आष्टीचे पोलिस निरीक्षक कुमारसींग राठोड व पोलीस सीपाई बेंगलाजी दूर्गे, रत्नाकर खेकारे, चालक विलास दरो यांनी केली. पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.