एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट सामाजिक संस्थे तर्फे गरीब गरजूना ब्लँकेट वाटप.

155

एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट सामाजिक संस्थे तर्फे गरीब गरजूना ब्लँकेट वाटप.

  ===मुख्य मुद्दे===
● ब्लँकेट मुळे टळू शकते अनेक गरीबाचे मृत्यू…
● एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट ही गोर गरीबासाठी काम करणारी सामाजिक संस्था.
● या संस्थेने अनेक गरीब कुटुंबातील मुलीचे लग्न करुन दिले.
● वेळो वेळी अनेक गरजूना ब्लँकेट व अन्न धान्य वाटप करण्यात आले.

एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट सामाजिक संस्थे तर्फे गरीब गरजूना ब्लँकेट वाटप.
एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट सामाजिक संस्थे तर्फे गरीब गरजूना ब्लँकेट वाटप.

नीलम खरात ✒
मुंबई महानगर प्रतिनिधी
मुंबई:- आज महाराष्ट्र सह मुंबईत गोरगरीब, लाचार, असाहाय, गरजू लोकांचे हातावरच्या पोट भरणाराचे हाल होत आहेत. त्यात हिवाळ्याचा मौसम सुरु झाला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे अशी दुहेरी संकटात सापडलेल्या गरीब कुटुंबाला मदतीची सामाजिक जान ठेवत एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थे मार्फत गरीब गरजूना मोफत ब्लँकेट वाटप एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट या संस्थेचे सलाहगार श्री. सगीर कुरैशी व संस्थापक अध्यक्ष श्री. एम कुरैशी यांच्या हस्ते वाटपाची सुरवात करण्यात आली, यावेळी अनेक लोकांनी या ब्लँकेट वाटप करण्याच्या कामाचे कौतुक केले संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सध्या कडयाक्याच्या थंडीचा हंगाम सुरू झाला आहे. या कडकडयात्या थंडी मुळे दरवर्षी अनेक वृद्ध, पागल, भिकारी, रस्त्यांवर राहणारे लोक मृत्यूमुखी पडत असतात. त्यांमुळे अशा जीव घेणा-या थंडी पासुन लोकांचा बचाव व्हावा या सामाजिकदृष्ट्या ऊद्देशाने एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्टने धारावी येथील झोपडपट्टी परिसरात 50 गरीब परीवाराना ब्लँकेट आणि 50 रुपये प्रती व्यक्ती म्हणून मदत केली आणि त्यांचे हालचाल विचारले.

ऑनलाइन दान करण्यासाठी QR कोर्ड
ऑनलाइन दान करण्यासाठी QR कोर्ड..

 या वेळी संस्थेचा ऊद्देश आणि कार्याची माहिती देताना एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. कुरैशी यांनी सांगितले की, अनेक गरीब व असाह्याय व्यक्ती थंडीमुळे थरथर कापतात अशा व्यक्तीना ब्लँकेट दान करुन मदत करावी. आम्ही संस्थेच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहोत. गरीब अनाथ मुलीचे विवाह, अन्नधान वाटप, ब्लँकेट वाटप यातुन आम्हाला संपुर्ण मुंबई मधून चांगला प्रतिसाद मिळत आहे या सामाजिक कार्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रच्या लोकांनी आर्थिक मदत करून प्रोत्साहन दिले तर, संस्थेच्या या सामाजिक कामासाठी सरळ हाताने दान करू जास्ती जास्त लोकांना ब्लँकेट व अन्नदान दान करून गरजूचे पोट भरण्याचे आणि थंडी पासुन बचावाचे सामाजिक कार्य चालू ठेवण्यास मदत करावी असे आवाहन करण्यात आले. एम.आर.क्यू एजुकेशनल अण्ड चैरीटेबल ट्रस्ट ही सामाजिक संस्था सामाजिक कार्यासाठी मेहनत घेत आहेत पुढेही मेहनत घेणार आहेत.