शेतीच्या नुकसान भरपाईसाठी आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे पुढाकार!
तेलंगणा प्रशासनाला पाठपुरावा केले
भूसंपादणाच्या कार्यवाहीसाठीही हालचाली

तेलंगणा प्रशासनाला पाठपुरावा केले
भूसंपादणाच्या कार्यवाहीसाठीही हालचाली
✒📘अमोल रामटेके अहेरी तालुका प्रतिनिधी,9405855335📘✒
*अहेरी:*- सिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून यंदाच्या नुकसानीच्या भरपाईसाठी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी वेगात चक्रे फिरविले असून तेलंगणा प्रशासनाकडे नुकसानीचे पाठपुरावा केल्याने लवकरच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
तेलंगणा प्रशासन नुकसानीची भरपाईसाठी पहिला टप्पा 15 लाख तर दुसरा टप्यात 16 लाख असे एकंदरीत 31 लाख रक्कमेचे तरदूत केले असून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीच्या त्या-त्या प्रमाणात नुकसान भरपाईची रक्कम अदा करणार आहेत.
मेडीगट्टा बॅंरेजचे पाणी अडविल्याने व बॅक वाटरमुळे दरवर्षी मेडिगट्टा प्रकल्पालगतच्या शेतीचे अतोनात नुकसान होत असल्याने प्रामुख्याने शेतकरी व सोबतच तेलंगणा सरकारला दरवर्षी नुकसान भरपाई देणे परवडण्यासारखे नसल्याने लगतच्या जमिनी भूसंपादन व अधिग्रहनासाठी शेतकरी स्वतः तयार झाले असून तसे निवेदन आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि अहेरीचे उपविभागीय अधिकारी श्रीअंकीत(भा. प्र.से.) यांच्याकडे गुरुवार 11 नोव्हेंबर रोजी सिरोंचाचे माजी नगर सेवक सतीश भोगे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मदनय्या मादेशी यांच्या नेतृत्वात असंख्य प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी जमीन शासनाकडून भूसंपादन करण्यासाठी निवेदन दिले आहे.
आमदार धर्मराव बाबा आत्राम शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातील शेतीच्या नुकसान भरपाईसाठी व कायमचा तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेत आहेत.
*बॉक्स*
*असंख्य शेतकऱ्यांनी आमदार व एसडीएम यांना निवेदन दिले!*
दरवर्षी मेडिगट्टा प्रकल्पामुळे उभ्या पिकांचे नुकसान होत असून लगतच्या जमिनी बारमाही पाणी व ओलसर राहत असल्याने जमिनीत उत्पादन घेणे अशक्य असल्याने आमदार धर्मराव बाबा आत्राम आणि उपविभागीय अधिकारी श्रीअंकित यांना जमीन शासनाकडून भूसंपादन करण्यासाठी गुरुवारी निवेदन दिले.
निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश भोगे व मदनय्या मादेशी यांच्या नेतृत्वात व्यंकटेशम येल्लाला, बानय्या मंचार्ला, लसमया गरपट्टी, व्यंकटेश तोकला, हैदर गरपट्टी, लक्ष्मण गणपरपू, श्रीराम नागुला, सुधाकर दुरशेट्टी, लक्ष्मीनारायण मेडी, लसमया मेडी, महेश येल्लाला, मुत्यालु तोकला, किष्टय्या मादेशी,पोचम गरपट्टी, अंकुलू गड्डम, चंद्रय्या मंचार्ला, शंकर दाया आदी व असंख्य प्रकल्पबाधित शेतकरी होते.