अल्लीपुर येथे ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची बैठक संपन्न.

51

अल्लीपुर येथे ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची बैठक संपन्न.

अल्लीपुर येथे ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची बैठक संपन्न.
अल्लीपुर येथे ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची बैठक संपन्न.

✒️ प्रशांत जगताप ✒️
कार्य संपादक मिडिया वार्ता न्युज
📲 9766445348 📲
हिंगणघाट:- वर्धा जिल्हातील अल्लीपुर येथे नुसतीच ज्येष्ठ नागरिक निराधार संघटनेची बैठक घेण्यात आली या सभेला संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मंगलाताई ठक उपस्थित होत्या.

आज मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि निराधाराना त्रास सहन कारवा लागत आहे. शासनाचा अनेक योजना आहे पण त्याचा लाभ सर्व सामान्य नागरिकांना पर्यंत पोहचत नाही. त्यासाठी जेष्ठ नागरिक निराधार संघटना हे माघिल अनेक वर्षा पासुन कार्य करत आहे. याच पार्श्वभूमीवर काल अल्लीपुर येथे बैठक घेण्यात आली.

या बैठकीत निराधार संघटना हिंगणघाट तालुका अध्यक्ष कल्पनाताई कांबळे, तालुका उपाध्यक्ष विद्याताई वाघमारे तर तालुका सचिव पदी मेघा चंदणखेडे तर कोषाध्यक्ष पदी जयश्री थूल यांची नियुक्ती करण्यात आली. तर अल्लीपुर सर्कल अध्यक्ष दिपाली वैद्य तर उपाध्यक्ष अर्चना भगत तर सचिव पदी प्रतिभाताई झिल्पे यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकी नंतर अल्लीपुर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर देशमुख व अल्लीपुर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक दत्तात्रय दिवटे यांची भेट घेवून जनतेस प्रशासनाची मदत व्हावी व सर्वसामान्यांना त्रास होवू नये यासाठी चर्चा करण्यात आली.