चंद्रपुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ द्या: राजु झोडे

50

चंद्रपुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ द्या: राजु झोडे

वंचित ची जिल्हाधिकारी यांच्याकडे मुदतवाढीची मागणी

चंद्रपुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ द्या: राजु झोडे
चंद्रपुर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी प्रवेशासाठी मुदतवाढ द्या: राजु झोडे

सौ.हनिशा दुधे
तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
मो 9764268694

चंद्रपूर:- सध्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करताना विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण पडलेला दिसत आहे. मधातच दिवाळी सुट्ट्या आल्याने विद्यार्थी आपल्या स्वगावी गेले होते. प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्राची गरज असते. काही काळात सर्वर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना मूळ कागदपत्रे व कास्ट व्हॅलिडीटी काढण्यासाठी अडचण निर्माण झालेली होती. अर्थातच जिल्ह्यातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना उद्भवलेल्या नकारात्मक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

अभियांत्रिकी प्रवेश पात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी याकरिता वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले व निवेदनाद्वारे मागणी केली. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यांची प्रशासन आले दखल घ्यावी व विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी अपेक्षा राजु झोडे जयदीप खोबरागडे कृष्णा पेरकावार यांनी व्यक्त केली.