धाब्यातील अवैध मुरुम खाणितील जेसीबी जप्त

48

धाब्यातील अवैध मुरुम खाणितील जेसीबी जप्त

धाब्यातील अवैध मुरुम खाणितील जेसीबी जप्त
धाब्यातील अवैध मुरुम खाणितील जेसीबी जप्त

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :- धाबा डोंगरगांव शेतशिवारात शासनाचा कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना चुनखडी युक्त मुरमाचे उत्खनन करून वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती महसूल पथकाला मिळाली या माहीतीच्या आधारावरुन पथकाने मोक्यावर धाड टाकून उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणी जेसीबी आढळून आली सोमवारी ही जेसीबी जप्त करुन पोलीस पाटलांच्या सुपुर्त करण्यात आली गूप्त माहीतीच्या आधारावरुन मंडळ अधिकारी सुर्वे ..बैस ..पटवारी भदाडे .. पोलिस पाटील साजन झाडे यांनी धाबा डोंगरगांव शेतशिवारात धाड टाकली येथून चुनखडी युक्त मुरुम पोडसा व धाबा या सध्या सुरू असलेल्या मार्गावर अनेक दीवसापासुन वाहतुक केली जात होती दरम्यान त्यांच्याकडील परवाण्याची मुद्दत 30 आक्टोंबर रोजी चे समाप्त झाले होते मुद्दत संपल्यानंतर ही खदानीच्या परवानधारकाने उत्खनन व वाहतूक सुरुच ठेवली यादरम्यान वन आणी महसूल विभागांचे देखील त्यांच्या या कारणाम्याकडे दुर्लक्ष होत राहीले 15 नोव्हेंबर ला सकाळपासून या खदानीवरुन मुरुम वाहतूक सुरू असल्याची माहिती पटवारी ताजणे यांना मिळाली त्यांनि त्याबाबत वरीष्टाना कळविले दुपारनंतर महसूल विभागांचे पथक खदानीवर दाखल झाले यावेळी मुल पोडसा रोडवेज प्रा..ली ..तळोधी तर्फे रामबाबू रामास्वामी पल्ले रा बाळापूर तळोधी यांच्या नावे परवाना असलेल्या खदानीवरुन धाबा येथील स्वप्नील अणमूलवार यांच्या मालकीची जेसीबी वाहन जप्त करण्यात आले