नगर परिषद नागभीडच् या वतीने येथील स्मशानभूमीत 500 तुळस रोपट्यांची लागवड करण्यात आली

62

✒अरुण भोले✒
नागभीड तालुका प्रतिनिधी
94033 21731

नागभीड : -येथील ट्विंकल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी हातात तुळशीची रोपटे घेऊन स्मशानभूमीत आले. यावेळी नगराध्यक्ष प्रा डॉ उमाजी हिरे, उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, बांधकाम सभापती सचिन आकुलवार, आरोग्य सभापती अर्चना मरकाम, नगरसेवक शिरीष वानखेडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजारभाई धमानी, माजी अध्यक्ष हनीफ भाई जादा यांची उपस्थिती होती. यावेळी प्रमुख अतिथीनी तुळशीची हि रोपटी ऑक्सिजन निर्मितीकरता महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगून नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे कौतुक केले. तर नगर परिषद चे अध्यक्ष हिरे आणि उपाध्यक्ष तर्वेकर यांनी ही रोपटी जिवंत ठेवण्याची हमी नगरपरिषदेची राहील याची ग्वाही दिली. उल्लेखनीय बाब हि की ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या मार्गदर्शन वयानुसार ही रोपटी दोन-तीन घरीच तयार केली होती. या कार्यक्रमास प्रशासकीय अधिकारी नीलिमा रामटेके, विद्युत अभियंता शशांक डांगे, लेखापाल नकुल भाजीपाले, कर निरीक्षक भाग्यश्री भेदे, आरोग्य अभियंता उमेश शेंडे, ट्विंकल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे उपस्थित होते.