चाळीसगाव: खाऊच्या आमिष दाखवुन नातलगानेच केला चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार.

✒️चाळीसगाव प्रतिनिधी✒️
चाळीसगाव:- जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथून एक संतापदायक बातमी समोर आली आहे. त्यामूळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. चाळीसगाव येथे एका चार वर्षीय नाबालीक चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे. या प्रकरणी नराधम तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
एका 26 वर्षीय नराधम आरोपी सावळाराम भानुदास शिंदे हा पीडित बालिकेच्या नात्यातील आहे. खाऊ घेऊन देण्याच्या आमिष दाखवुन त्याने चिमुरडीला जवळ बोलावलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला जात आहे.
अत्याचार केल्यानंतर चिमुरडीला तिच्या आईजवळ सोडून त्याने पलायन करण्याचा प्रयत्न केला. मुलीचे रक्ताने माखलेले कपडे पाहून आईला शंका आली. त्यानंतर तिने आरडाओरड केली. नराधम आरोपी सावळाराम शिंदे पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना लोकांनी त्याला पकडलं आणि चोप देऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं. जमावाच्या मारहाणीत आरोपी किरकोळ जखमी देखील झाला आहे.
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मंदार करंबळेकर यांनी बालिकेवर अत्याचार झाल्याचे सांगितले. बालिकेला इजा झाल्याने तिला पुढील उपचार करण्यासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना असून आरोपीला कठोर शासन व्हावं, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या दक्षता समिती सदस्य सोनाली लोखंडे यानी केली आहे.