Home latest News हिंगणघाट: 26/11 शहीद दिनाचा प्रशासनाला पडला विसर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाडनी वाहिली...

हिंगणघाट: 26/11 शहीद दिनाचा प्रशासनाला पडला विसर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाडनी वाहिली श्रद्धांजली.

126

हिंगणघाट: 26/11 शहीद दिनाचा प्रशासनाला पडला विसर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाडनी वाहिली श्रद्धांजली.

हिंगणघाट: 26/11 शहीद दिनाचा प्रशासनाला पडला विसर, सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाडनी वाहिली श्रद्धांजली.
शहीद स्मारकाला अभिवादन करताना सुरेश गायकवाड

✒️प्रशांत जगताप✒️
कार्यकारी संपादक मिडिया वार्ता न्युज
हिंगणघाट:- 26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईसह संपूर्ण देशासाठी काळा दिवस ठरला होता. याच दिवशी मुंबईवर दहशतवाद्यांनी (26/11) भ्याड हल्ला झाला केला. जवळपास 10 दहशतवाद्यांनी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करत शेकडो नागरिकांचे जीव घेतले. हा भ्याड दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावली. यामध्ये अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात शहीद झाले होते. त्यामूळे संपुर्ण देशात यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असताना हिंगणघाट शहरातील प्रशासन उदासीन वर्तन समोर आले आहे.

हिंगणघाट शहरातील कारंजा चौक येथे लाखो रुपये खर्च करुन देशासाठी शहीद झालेल्या जवानाच्या कार्याला सलाम म्हणून जय स्तंभाची आणि शहीद जवान स्मारकची उभारणी करण्यात आली. पण 26/11 याद मध्ये इथे ना फुल हार, ना साधी मेनबत्ती, ना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यामूळे सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यानी हिंगणघाट प्रशासनावर आणि राजकिय नेत्यांवर प्रश्न चिन्ह उभे केले आहे. त्यामूळे व्यतीत झालेल्या सुरेश गायकवाड यानी 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाना स्थानिक कारंजा चौक येथील स्तंभाला अभिवादन केले.

शहीद स्मारकाला अभिवादन करताना सुरेश

या वेळी बोलताना सुरेश गायकवाड म्हणाले हिंगणघाट शहरातील मुख्य चौक असणा-या परीसरात लाखो रुपये खर्च करुन शहीद स्मारक उभारले पण मुंबई हल्ल्यातील शहीद दिनी शहीद स्मारकाला अशा पद्धतीने हिंगणघाट प्रशासन आणि राजकिय नेते याना विसर पडावा? त्यामूळे आम्ही आज मी आपली सामाजिक जिम्मेदारी म्हणुन कारंजा चौकात जाऊन शहीद स्मारकला अभिवादन फुल हार अर्पण करुन श्रद्धांजली वाहीली.