माता झाली वैरणी 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला फेकलं विहिरीत. मुलाचा दुर्दैवी मृत्यु.

53

माता झाली वैरणी 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला फेकलं विहिरीत. मुलाचा दुर्दैवी मृत्यु.

माता झाली वैरणी 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला फेकलं विहिरीत. मुलाचा दुर्दैवी मृत्यु.
माता झाली वैरणी 2 वर्षांच्या चिमुकल्या मुलाला फेकलं विहिरीत. मुलाचा दुर्दैवी मृत्यु.

मिडिया वार्ता न्यूज टिम✒

लातूर:- लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगावजवळील राठोडा गावातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. एक माता आपल्या चिमुकल्यासाठी वैरणी झाली. कुठलिही आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार होते. पण लातूर जिल्हामध्ये एक आई आपल्या 2 वर्षांच्या मुलाचा जिवावर ऊठली आणि विहिरीत फेकून दिल्याची घटना घडली आहे.

राठोडा गावात एक आई आपल्या चिमुकल्याची हत्यारण बनली तिने आपल्या काळजाच्या तुकडयाल विहिरीत फेकल्यानंतर दोन वर्षांच्या चिमुकल्या जीव वाचवण्यासाठी त्या कोवळ्या जीवाची तडफड सुरु होती. लहानगा पाण्याबाहेर येण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होता. हातपाय मारुन पाण्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होता. मात्र हे पाहून जन्मदात्रीच्या मनाला पाझर फुटला नाही. आणि आपल्या डोळ्यानी हे सर्व बघत होती. लेकराचा जीव गेल्याची खात्री पटल्यानंतर तिचा जीव शांत झाला, अशी माहिती आहे. माया व्यंकट पांचाळ वय 25 वर्ष असं या निर्दयी आरोपी आईच नाव आहे. या महिलेला संपत पांचाळ नावाचा दोन वर्षांचा मुलगा होता. या महिलेचा पती व्यंकट पांचाळ हे लातूरमध्ये एका खासगी कंपनीमध्ये वॉचमॅन म्हणून नोकरी करत आहेत.

नेहमी प्रमाणे व्यंकट पांचाळ कामावरून घरी आले. त्यांनी आपल्या मुलाबद्दल विचारणा केली असता आरोपी मायाने काहीच सांगितले नाही. मुलगा कुठे दिसत नसल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मायाकडे विचारणा केली असता, मी त्याला विहिरीत फेकून दिलं असं उत्तर दिलं. आधी या महिलेच्या सांगण्यावर कुणीच विश्वास ठेवला नाही. पण, लोकांनी घराशेजारीच असलेल्या शिंदे यांच्या विहिरीकडे धाव घेतली आणि डोकावून पाहिले असता मुलाचा मृतदेह आढळून आला. मुलाचा मृतदेह पाहताच वडील व्यंकट पांचाळ यांनी एकच आक्रोश केला.

आरोपी माया आणि व्यंकट यांचा संपत नावाचा हा एकुलता एक मुलगा होता.  माया आणि व्यंकट यांच्यामध्ये नेहमी वाद होत होते. किरकोळ कारणावरून दोघांमध्ये आठ दिवसांपूर्वीच कडाक्याचं भांडण झालं होतं. सतत होणाऱ्या भांडणाचा राग मनात धरून तिने हे कृत्य केल्याचं बोललं जात आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पतीच्या फिर्यादीवरून निर्दयी माता मायाला अटक करण्यात आली आहे. तिनेही गुन्ह्याची कबुली दिली.  तिच्याविरोधात कलम 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.