अमरावती जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 11 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालत.

57

✍️मनोज खोब्रागडे✍️
मध्य महाराष्ट्र ब्युरो चीफ
9860020016

अमरावती : – अमरावतीसह सर्व न्यायालयात पुढील आठवड्यातील शनिवारी (11 डिसेंबर) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, त्यात दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत .

त्यातील सहभागासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. संबंधितांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा, तसेच दाखलपूर्व प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतीसमक्ष प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावेत असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अमरावती चे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी तसेच सचिव जी. आर. पाटील यांनी केले आहे.