प्रेमीयुगुलाची एकाच झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या.

प्रतिनिधी
गडचिरोली:- जिल्हातील धानोरापासून गावापासुन एक किलोमीटर अंतरावर चव्हेला रोड लगत कम्पार्टमेंट 520 मध्ये रात्री प्रेमीयुगुलाने एकाच झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची हृदय हेलवनारी घटना समोर आली आहे. यामुळे या परीसरात एकच खळबळ उडाली आहे. मुलगी विद्या सदाशिव उसेंडी वय 22 वर्ष, राहनार पवनी व मुलगा राजेश लालसाय पोटावी वय 28 वर्ष, राहनार दराची अशी मृतांची प्रेमवीराची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दोघेही धानोरा तालुक्यातील रहिवासी आहेत. कप्मार्टमेंट 520 मध्ये झाडाच्या एकाच फांदीला विद्याने ओढणीने तर राजेशने दुप्पट्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. या आत्महत्या प्रेम प्रकरणातून घडल्याचे बोलले जात आहे. दोघेही रात्रीपासून बेपत्ता होते. घरच्यांनी शोध घेतला असता शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. या प्रकरणाचा तपास धानोरा पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here