भा. लो. सं.मुंबई ‘उपाध्यक्ष पदी’ नितीन सातपुते यांची नियुक्ती
गुणवंत कांबळे, मुंबई प्रतिनिधी
मो.नं.-९८६९८६०५३०
मुंबई- भारतीय लोकसत्ताक संघटना मुंबई उपाध्यक्ष पदी मा.नितीन सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली.न्याय, स्वतंत्र, समता, बंधुता या मूल्यांशी कटिबद्ध असणाऱ्या, भारतीय संविधानाच्या काटेकोर अंमलबजावणी साठी झटणाऱ्या, लोकांचे सुख केंद्र बिंदू ठेऊन कार्य करणाऱ्या, भारतीय लोकसत्ताक संघटना या संघटनेच्या मुल्यांशी प्रेरित होऊन मा नितीन सातपुते सर यांनी संघटनेत काम करण्याची इच्छा दर्शवली . संघटनेने नितीनजी यांचे कार्य आणि संघटनेबद्दल असलेली निष्ठा पाहून भारतीय लोकसत्ताक संघटना मुंबई उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली सदर नियुक्ती पत्र हे संघटनेचे *अध्यक्ष मा अमोलकुमार बोधिराज सर* यांच्या हस्ते ,तसेच उपस्थित कार्यकारिणी च्या समवेत *लोकसत्ताक स्टडी सेंटर* सायन मुंबई येथे देण्यात आले.
या निवडीमुळे सर्व स्तरावरून नितीन सातपुते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.यावेळी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते वैभव मोहिते सर ,सानी कांबळे सर , मनिष जाधव सर ,मंगेश खरात सर,विशाल गायकवाड सर ,पिलाजी कांबळे सर योगेश कांबळे सर, उपस्थित होते.