चेकदरूर येथे देशी विदेशी दारू चा महापुर
पोलिस प्रशासन झोपेत
गोंडपिपरी तालुक्यातील धक्कादायक प्रकार
भिमराव देठे
भं तळोधी प्रतिनिधी
मो नं 8999223480
भं तळोधी:- गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथे देशी विदेशी दारू चा महापुर आहे मागील कित्येक वर्षांपासून हा दारुचा महापूर चालूचं आहे या कडे मात्र पोलिसांनी दूर्लक्ष केले आहे हे नवलच ..या दारू विक्री मध्ये पोलिस प्रशासन तरं सहभागी नसेल ना असी चर्चा गावात रंगू लागली आहे चेकदरूर येथे गावातील नवयुवक या दारू च्या धंद्यात गुंतले आहे
चेकदरुरच नाही तर परीसरातील बहुतेक ठिकाणी या देशी विदेशी दारू चा महापुर आहे या कडे पोलिस विभागाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे