नवरा, बायको दोघेही निवडून आले, अन् राष्ट्रवादीने खाते उघडले निकाल जाहीर होताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष करित आंनदोत्सव साजरा केला नवरा बायकोच्या विजयाने गोंडपिपरीत प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आपले खाते उघडले

127

नवरा, बायको दोघेही निवडून आले, अन् राष्ट्रवादीने खाते उघडले

निकाल जाहीर होताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष करित आंनदोत्सव साजरा केला

नवरा बायकोच्या विजयाने गोंडपिपरीत प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आपले खाते उघडले

नवरा, बायको दोघेही निवडून आले, अन् राष्ट्रवादीने खाते उघडले निकाल जाहीर होताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष करित आंनदोत्सव साजरा केला नवरा बायकोच्या विजयाने गोंडपिपरीत प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आपले खाते उघडले

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

गोंडपिपरी :-गावखेड्यांतील निवडणुका म्हणजे लईच भारी. नगरपंचायत निवडणुकांत स्थिती वेगळी नाही. इथे स्वतः निवडून येणार कि नाही, यावर स्वतः उमेदवाराचा शेवटपर्यत भरोसा नसतो. पण आज गोंडपिपरी नगरपंचायतीच्या निवडणुकीत कमालच झाली. निवडणुकीचा निकाल जाहिर झाला, अन् नवरा बायको दोघांनीची बाजी मारली. निकाल जाहीर होताच समर्थकांनी प्रचंड जल्लोष करित आंनदोत्सव साजरा केला. नवरा बायकोच्या विजयाने गोंडपिपरीत प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसने (NCP) आपले खाते उघडले.

गोंडपिपरी नगरपंचतीच्या सतरा प्रभागांच्या निवडणुकीचे (Election) निकाल आज जाहिर करण्यात आले. सकाळी १० वाजतापासून निकालाला सूरवात झाली. प्रभाग क्रमांच ५मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष महेद्रसिंह चंदेल यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. त्यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करित असतानाच प्रभाग क्रमांक ६चा निकाल जाहिर झाला. अन यात महेंद्रसिंह चंदेल यांची पत्नी सविता चंदेल या बहूमताने निवडून आल्याचे स्पष्ट झाले. दोन टप्प्यांत पार पडलेल्या निवडणुकीत नवरा बायको निवडून आल्याचे समजताच त्यांच्या समर्थर्कांनी प्रचंड जल्लोष केला.