राजाभोज जयंती वसंत पंचमीलाच साजरी करा : तुषार राहांगडाले

✍मुकेश मेश्राम✍
तालुका प्रतिनिधी लाखणी
जिल्हा भंडारा
📱7620512045📱
लाखणी:- पोवार समाजाचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांची जयंती वसंत पंचमीलाच साजरी करावी, अशी ईच्छा लाखनी तालुका अध्यक्ष तुषार राहांगडाले यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश व छत्तीसगढ राज्यात पोवार समाज बहुसंख्येनी आहे. भोज, भोजदेव, भोजराज, भोजपती, नरेंद्र आदी नावांनी चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांना संबोधले जातात. बसंत पंचमीपासून राजाभोज जयंती साजरी केली जाते.
लाखनी तालुक्यात सिंदीपार, सालेभाटा येथे मोठ्या उत्साहात राजाभोज जयंती साजरी
करण्यात येते. राजाभोज जयंती गावागावात साजरी करण्यात यावी. ज्या गावांमध्ये पोवार समाजाचे वास्तव आहे. त्या गावांमध्ये किमान पुजनतरी करण्यात यावे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक प्रबोधनातून समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. अशी ईछा लाखनी तालुका अध्यक्ष तुषार राहांगडाले यांनी व्यक्त केली.








