युवा स्वभिमान पक्षा तर्फे राजुरा येथ शिवजयंती महोत्सव केला जल्लोषात साजरा

52

युवा स्वभिमान पक्षा तर्फे राजुरा येथ शिवजयंती महोत्सव केला जल्लोषात साजरा

युवा स्वभिमान पक्षा तर्फे राजुरा येथ शिवजयंती महोत्सव केला जल्लोषात साजरा

*प्रथम तेलंग चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो नंबर 7020016684*

:- आज दिनांक:- १९ फेब्रुवारी २०२२ ला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम युवा स्वभिमान पक्ष राजुरा, जि. चंद्रपुर तर्फे राजुरा येथे छत्रपती शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण तथा पूजा अर्चना करून, घोषणा करत फटाके फोडून व युवा स्वाभिमान पक्षाच्या राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयाच्या इमारती वरती भगवा झेंडा फडकवीत जल्लोषात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळेस युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांच्यासह
राजुरा शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, नानाभाऊ आईटलावार, व्यापारी राजुरा शहर, निखिल बजाईत, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख राहुलभाऊ चव्हाण, राजुरा युवा आघाडी शहर अध्यक्ष आल्विन सावरकर, राजुरा युवा आघाडी सचिव, जगदीशभाऊ साटोणे, भूपेशभाऊ साटोणे, कैलासभाऊ काहीलकर, अभिजित बोरकुटे, वतन बक्सरीया, आजवा टाक, रहीम शेख, लोकेश बुटले आदी पक्षाचे पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.