Home latest News मोहाडी तालुक्यात सट्टा मटका,गांजा,रेती तस्कर,दारु,जुगार, लॉटरी व्यवसाय जोमात, आणि पोलीस प्रशासन मात्र...

मोहाडी तालुक्यात सट्टा मटका,गांजा,रेती तस्कर,दारु,जुगार, लॉटरी व्यवसाय जोमात, आणि पोलीस प्रशासन मात्र कोमात.

81

मोहाडी तालुक्यात सट्टा मटका,गांजा,रेती तस्कर,दारु,जुगार, लॉटरी व्यवसाय जोमात, आणि पोलीस प्रशासन मात्र कोमात.

मोहाडी तालुक्यात सट्टा मटका,गांजा,रेती तस्कर,दारु,जुगार, लॉटरी व्यवसाय जोमात, आणि पोलीस प्रशासन मात्र कोमात.

✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱८३०८७२६८५५📱
📞८७९९८४०८३८📞

मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका हा नावाजलेला आहे. या ठिकाणी कसल्याही प्रकारची रोजगार निर्मिती नाही. तरीही मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ, बेंकिंग सेक्टर, पथ संस्था,फायनान्स सेक्टर, बियर बार,दारु भट्टी,मोहफुलाची दारु भट्टी, सट्टा मटका, लॉटरी,गांजा,जुगार अड्डा, अवैध्य रेती तस्कर यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. तरीपण रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध नसल्याने ६० किमी अंतर जनतेला नेहमीच दैनंदिनी गाठावी लागते.असे असतांना सुध्दा मोहाडी तालुक्यात येणारे १०१ ( एकशे एक ) छोट्या मोठ्या गावामध्ये सट्टा मटका, व वरील लिहलेले सगळे अवैद्य धंदे, मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. पण यावर कार्यवाही फार कमी प्रमाणात होत आहे.याचे कारण म्हणजे हे व्यवसाय मोठ मोठ्या नेत्यांच्या आशीर्वादाने सुरु असल्याची खात्री व चर्चा नेहमी ठिकठिकाणी होत असते.
यापासून मिळणारा नफा हा कोट्यवधीच्या घरात असताना देखील पोलीस प्रशासन मात्र या व्यवसायावर आळा घालण्यासाठी कसलेही निर्बंध लावीत नाही असे स्पष्ट दिसून येत आहे. व महिना भरला की प्रत्येक गावा गावात जाऊन वसूली घेत आहेत. असे का ? का शासन त्यांना महिन्याचा पगार देत नाही ? असा प्रश्न सुशिक्षित बेरोजगार युवक वर्गात पसरलेला आहे.या व्यवसायामुळे अनेक घरे परिवार उध्वस्त झाले आहेत. या अवैध व्यवसायापासून पोलीस स्टेशन मध्ये अनेक गुन्हे नोंद आहे.याची पोलीस प्रशासनाला खात्री असुनही मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसायास चालना का देत आहेत? याची सध्या मोठ्या प्रमाणावर या मोहाडी तालुक्यात चर्चा रंगली असुन यावर कठोर असे निर्बंध लाऊन ” नायक ” चित्रपट तसेच “शिघम” चित्रपटातील समाज प्रबोधनात्मक तसेच भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या कलाकृतीचे अनुकरण करुन दाखविणारा कलावंत कलाकार याची भूमिका साकार करणाऱ्या निर्भिड ( निडर) कलाकाराची गरज आज मोहाडी तालुक्याला भाषत आहे. असे इंडीया वार्ता न्युज चे मोहाडी तालुका पत्रकार श्री. मा. भवन भाऊ लिल्हारे यांना वाटत आहे.