Home latest News World Wildlife Day च्या निम्मित्ताने: गेल्या शंभर वर्षात पृथ्वीवरून नाहीसे झालेले प्राणी

World Wildlife Day च्या निम्मित्ताने: गेल्या शंभर वर्षात पृथ्वीवरून नाहीसे झालेले प्राणी

122
world animal day pictures
गेल्या शंभर वर्षात पृथ्वीवरून नाहीसे झालेले प्राणी

वर्ल्ड वाइल्डलाईफ फंडच्या रिपोर्टनुसार गेल्या ४४ वर्षात पृथ्वीवरील वन्यप्राण्यांच्या संख्येत तब्बल ६० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे.

मनोज कांबळे

३ फेब्रुवारी, मुंबई:  दरवर्षी ३ मार्च रोजी जागतिक वन्यप्राणी दिन साजरा केला जातो. सध्याच्या घडीला पृथ्वीवर तब्बल ९० लाख प्राणी आणि जंगली वनस्पतींच्या विविध प्रजाती असल्याचा अंदाज शास्त्रद्यांकडून बांधला जात आहे. पृथ्वीवरील प्राण्यांपैकी मानवप्राणी सर्वात बुद्धिमान असल्याचे तर सर्वाना ठाऊक आहेच. जंगलातूनच उत्क्रांती करत आज मानवप्राणी चकाकत्या शहरात येऊन पोहचला आहे, आधुनिक तंत्रज्ञानांच्या साहाय्याने परग्रहांवर देखील जाऊन पोहचला आहे. पण यांमुळे सभोवताली राहणाऱ्या वन्यप्राण्यांच्या जीवनावर मात्र मानवाच्या या प्रगतीचा विपरीत परिणाम झाला आहे.

आकड्यांमध्ये सांगायचे झाल्यास वर्ल्ड वाइल्डलाईफ फंडच्या रिपोर्टनुसार गेल्या ४४ वर्षात पृथ्वीवरील वन्यप्राण्यांच्या संख्येत तब्बल ६० टक्क्यांनी घट झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या १०० वर्षाची माहिती काढल्यास हे आकडे अधिक चिंताजनक दिसून येतात. या कालावधीदरम्यान दरम्यान अनेक वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखे प्राण्यांचे अस्तित्व कळत-नकळतपणे झालेल्या मानवी हस्तक्षेपामुळे या जगातून नाहीसे झाले आहे. कसे होते ते प्राणी? चला पाहू?

Paradise parrot :पॅराडाइझ पोपट: १९२८ पासून नामशेष

 

मुख्यतः पूर्व ऑस्ट्रलियामध्ये सापडत असलेला पॅराडाइझ पोपट हा प्राणी १९२८ पासून नामशेष झाला आहे. दुष्काळ, गाई-गुरांच्या चराई क्षेत्रात झालेली अनियंत्रित वाढ आणि निलगिरी झाडांच्या वृक्षतोडीमुळे हा पक्षी नामशेष झाल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.

Sicilian wolf: सिसिलियन लांडगा: १९२० पासून नामशेष 

इटलीतील सिसिली बेटांवर आढळून येणाऱ्या या लांडग्याच्या प्रजातीचा १९२०च्या दशकात शेवट झाला. पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असल्याने त्याकाळी लोकांकडून मोठ्या प्रमाणावर सिसिलियन लांडगायांची हत्या केली जात असे. त्यातच बेटांवरील जंगलक्षेत्राचे प्रमाण कमी झाल्याचा विपरीत परिणाम त्यांच्या अन्नस्रोतांवर झाल्याने कालांतराने सिसिलियन लांडगायांची प्रजाती नाहीशी झाली.

Tasmanian tiger: टास्मानियन टायगर: १९३० पासून नामशेष

आस्ट्रेलियातील टास्मानियामध्ये हा वैशिट्यपूर्ण प्राणी आढळून येत असे. परंतु युरोपमधून ऑस्ट्रलियायात स्थायीक झालेल्या लोकांनी आपल्या मेंढयांची शिकार होऊ नये म्हणून टास्मानियन टायगर हत्या करण्याच्या योजना राबवल्या. तसेच सर्कस आणि प्राणी संग्रहालयात वापरण्यासाठी ह्या प्राण्याला पकडण्यास सुरुवात केली. शेवटी टास्मानियन टायगरचा रहिवासी परिसरात झालेल्या मोठ्या बदलांमुळे हा प्राणी नाहीसा झाला. १९३६ साली एका ऑस्ट्रलियायातील होबार्टमधील एका प्राणी संग्रहालयात शेवटच्या टास्मानियन टायगरचा मृत्यू झाला.

Japanese sea lion: जपानी सी लायन: १९५० पासून नामशेष

जपानी सी लायन नामशेष होण्यामागे मानवाकडून केली जाणारी हत्या हे सर्वात मोठे कारण होते. जपानी सी लायनच्या कातडीतून विशिष्ट प्रकारचे तेल मिळत असे. तसेच त्याच्या अवयवांचा वापर महागडी औषधें बनवण्यासाठी जपानमध्ये कला जात असे. तसेच जपानी सी लायनचा वापर सर्कशीमध्ये देखील केला जात असे. जपानी मच्छीमारांनी तब्बल १६,५०० सी लायनची शिकार केल्याच्या नोंदी अस्तित्वात आहेत. त्यातच दुसऱ्या महायुद्धात पाणबुडीच्या वापराचा जपानी सी लायनवर विपरीत परिणाम झाला आणि १९५० च्या पर्यंत त्याची प्रजाती जपानी समुद्र किनाऱ्यांवरून नाहीशी झाली.

Bubal hartebeest: बबल मृग: १९५० पासून नामशेष

बबल मृग आफ्रिका खंडाच्या उत्तर भागात प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर आढळून येत असे. प्राचीन इजिप्त लोकांच्या थडग्यांमध्ये बबल मृगची छायाचित्रे रेखाटलेली आढळून येतात. प्राचीन काळापासून या प्राण्याची मांसासाठी शिकार केली जात असे. बंदुकीचा शोध लागल्यानंतर या प्राण्याच्या शिकारीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. जसजशी आफ्रिका खंडात मानवी वस्ती वाढत गेली, तसतशी बबल मृगांची संख्या कमी होत गेल्याचे निदर्शनास आले होते. १९५४ साली बबल मृगाच्या शेवटच्या कळपाची शिकार झाल्याची नोंद आढळून येते.

Kākāwahie: काकावाही पक्षी: १९६० पासून नामशेष

हा हवाईयन पक्षी १९६३ साली शेवटचा पहिला गेला होता. ह्या पक्ष्याच्या नाहीसे होण्याचे मुख्य कारण होते मच्छर. मलेरिया, डेंग्यू सारखे मानवी आजार पसरवणारे मच्छरांच्या संख्येत वाढ झाल्याचा दुष्परिणाम ह्या पक्ष्यांवर झाल्याचा शास्त्रद्यांचा अंदाज आहे.

Pyrenean ibex: पायरेनियन आयबेक्स: २००० सालापासून नामशेष

स्पेन आणि फ्रान्स देशांच्या दरम्यान असलेल्या पायरेनिस पर्वतरांगांमध्ये पायरेनियन आयबेक्स हा प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळून येत असे. ह्या प्राण्याचे नाहीसे होण्याचे मुख्य कारणाबाबत अजूनही अभ्यास चालू आहे. परंतु या दुसऱ्या प्राण्यांच्या प्रजातींसोबत झालेल्या संघर्षामुळे आणि आजाराच्या साथी मुळे पायरेनियन आयबेक्स प्राणी नष्ट झाला असे मानले जाते.

West African black rhinoceros: पश्चिम आफ्रिकन काळा गेंडा: २०११ सालापासून नामशेष

पश्चिम आफ्रिकन काळा गेंड्याला २०११ साली नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते. २० व्या शतकाच्या सुरुवातीला आफ्रिकेत तब्बल १० लाख आफ्रिकन गेंडे असल्याचा अंदाज होता. २००१ साली ती संख्या केवळ २३०० वर आली होती. शंभर वर्षात गेंड्याची कातडी, शिंगासाठी केल्या गेलेल्या अवैध शिकारीच्यामुळे हा प्राणी आवाज पृथ्वीवरून नामशेष झाला आहे.