सालई ( बु.) या गावात नंदी पाणी पितो अशी अफवा
पदाधिकारी यांनी दिली मंदिरात प्रत्यक्ष भेट “
” सत्य काय आले आले उघळकिस, लोकांनी पसरविले होते अंधश्रद्धा, पाहण्यास लोकांची मंदिरात गर्दी “
✍ भवन लिल्हारे ✍
* मोहाडी तालुका पत्रकार *
📱 ८३०८७२६८५५ 📱
📞८७९९८४०८३८ 📞
मोहाडी :- मोहाडी तालुक्यात येणारे सालई ( बुज.) येथील मंदिरातील नंदी पाणी पितो अशी अफवा पसरवण्यात आली, गावातील व इतर गावातील मंडळी रात्री जमा झाली, आणि प्रत्येकाने त्या दगडाची बनलेली मूर्तीला म्हणजेच त्या नंदीला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, व ही मूर्ती पाणी पित होती असा त्यांचा दावा होता. जेव्हा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीने प्रत्यक्षात त्या गावामध्ये भेट दिली, त्यांनी चमच्याने पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, परंतु पाणी मुर्तीने प्याले नाही, त्या ठिकाणी काही रासायनिक घटक असतात हे घटक पाणी शोषून घेतात, त्यामुळे त्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टीकोन आहे लक्षात आले त्यामुळे लोकांना समजावून देण्यात आले आहे, ” मूर्ती पाणी पित नाही ” त्यामुळे तो प्रकरण सध्यातरी थांबलेला आहे,या प्रसंगी भंडारा जिल्हा संघटक डी. जी.रंगारी ( अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती जिल्हा संघटक ) मा.श्री.राहुल डोंगरे ( अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती तालुका संघटक ) मा.श्री.शिवशंकर टेंभरे ( जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघ ) मा.श्री. विनोद तुमसरे सरपंच, व गावकरी मंडळी या प्रसंगी उपस्थित होते.