रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठ हॉकी संघात निवड.

रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठ हॉकी संघात निवड.

रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या खेळाडूंची विद्यापीठ हॉकी संघात निवड.

✒ करण विटाळे ✒
हिंगणघाट तालुका ग्रामीण
प्रतिनिधी : 8806839078

हिंगणघाट : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर शारीरिक शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या आंतरमहाविद्यालयीन हॉकी निवड चाचणी स्पर्धा (सत्र २०२१-२०२२) ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालय , नागपूर येथे घेण्यात आल्या व हॉकी संघ जाहीर करण्यात आला . या संघात
रा. सु. बिडकर महाविद्यालयाच्या चार हॉकीपटू (१) अजय ढवळे, एम. ए. भाग – २,(२) आमिदखां पठाण, बी. ए. भाग – ३ , (३) कुणाल ढाले, बी. ए. भाग-१, (४) अभिषेक विठोले, बी. ए. भाग-१ यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेले खेळाडू दि. १६ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे पश्चिम विभागीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रा. तु. म. नागपूर विद्यापीठ हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे . खेळाडूंच्या यशाबद्दल ग्रामीण विकास संस्था अध्यक्ष डॉ. उषाकिरण थुटे , प्राचार्य बी. जी. आंबटकर,शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. बलराज अवचट, डॉ. जया जॉनजॉन तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी – माजी खेळाडू व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.