Home latest News गडचिरोली-चंद्रपुर मार्गावर “द बर्निंग कार”, एकाचा दुर्दैवी मृत्यू

गडचिरोली-चंद्रपुर मार्गावर “द बर्निंग कार”, एकाचा दुर्दैवी मृत्यू

101

अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.

संदीप तूरक्याल
चंद्रपूर शहर प्रतिनिधी
मिडीया वार्ता न्यूज चंद्रपूर
Mob: 9834024045

सावली:- सावली तालुक्यातील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या जवळ कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या एक इलेक्ट्रिक पोलला धडक दिल्याने एका व्यक्ती जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास घडली.

सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली-चंद्रपुर मार्गावरील सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या बाजुला असलेल्या एका इलेक्ट्रिक पोलला मूलकडे जाणाऱ्या कारने धडक दिल्याने कारला आग लागल्याची शंका वर्तविली जात आहे.

हे आपण वाचलंत का?

 

सदर आगीमुळे कारमधून सर्वत्र धुर पसरले. सदर वाहनाच्या काही अंतरावर देवीलाल यादव य 35 वर्षे रा. कांकेर जि. छत्तीसगड यांचे मृत्तदेह आढळून आले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आशिष बोरकर व पोलीस पथक दाखल झाले. अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकले नाही पुढील तपास सावली पोलीस करीत आहे .