मौजा कवलेवाडा येथे विवाहित महिलेने केली गळफास लावून आत्महत्या

59

मौजा कवलेवाडा येथे विवाहित महिलेने केली गळफास लावून आत्महत्या

मौजा कवलेवाडा येथे विवाहित महिलेने केली गळफास लावून आत्महत्या

भवन लिल्हारे ✍️
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
📱 ८३०८७२६८५५ 
📞 ८७९९८४०८३८

आमगाव ( दिघोरी) : भंडारा जिल्यातील मौजा कवलेवाडा येथे दिनांक १५ मार्च २०२२ रोज मंगळवारला नामे संगिता अरविंद बनसोड वय ४७ वर्षे रा. कवलेवाडा असे मृत महिलेचे नाव आहे. मुले शिक्षणासाठी बाहेर गावी असल्यामुळे पती पत्नीच मौजा कवलेवाडा येथे राहत होते. मंगळवारी महिलेचे पती हे कामासाठी बाहेर गेले होते. त्यावेली घरी कुणी नसल्याची संधी साधुन पिवळ्या रंगाच्या नायलान दोरान गळ्यामध्ये गळफास लाऊन आत्महत्या केली.

सायंकाळी महिलेचे पती घरी आल्यावर हि घटना उघडकीस आली. त्याने लगेच पोलीस स्टेशन कारधा येथे माहिती दिली. कारधा पोलीसाने घटनास्थळ गाठुन पंचनामा केला, तिच्या मागे पती, मुलगा, व दोन मुली आहेत. आत्महत्येचे कारण मात्र कळु शकले नाही.

हे आपण वाचलंत का?

 

या विवाहीत महिलेन घरातच गळफास लावून आत्महत्या कशी काय केली? याचे कारण कुनालाच माहीत नाही. पुढील तपास ठाणेदार राजेश थोरात यांच्या मार्गदर्शनात अशोक सरोदे करीत आहेत. पुढील तपास सुरुच आहे.