पालांदुर ते खराशी रसत्यावर दुचाकीच्या धडकेत दोन महिला गंभीर जखमी

✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
📱 8308726855 📱
📞 8799840838 📞
पालांदूर :- भंडारा जिल्हा लाखणी तालुक्यातील मौजा पालांदूर येथे भरधाव दुचाकीने धडक दिल्याने रसत्याच्या कडेला व्यायाम करत असलेल्या दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना लाखांदूर ते खराशी रोडवरील मोठ्या पुलाजवळ दिनाक २१ मार्च २०२२ रोज सोमवारला सकाळी ५:४५ वाजता च्या सुमारास घडली. सिमा रमेश पचारे वय २३ वर्षे, व रेखा धनराज गजापुरे वय . ४० वर्षे ( दोघेही रा. पालादूर ) अशी गंभीर जखमी यांचे नाव आहे. नेहमी प्रमाणे नलु शेंडे, सिमा पचारे, व रेखा गजापुरे सकाळी पालांदूर ते खराशी रसत्यावर फिरायला गेल्या होत्या ते रसत्या कडेला प्राणायम करत होत्या यावेळी पालांदूर कडून भरधाव वेगाने दुचाकीने या महिलांना धडक दिली. ही धडक बसताच सिमा व रेखा बेशुद्ध पडल्या. यावेळी नलु शेंडे यांनी आरडा ओरडा करत येणाऱ्या जाणाऱ्यांना थांबविले. या ठीकानी बघता बघता बऱ्याच लोकांची गर्दी झाली. या अपघातात रेखा यांच्या डोवऱ्याला जबर मार लागला. तर सिमा यांच्या पायावर जबर दुखापत झाली.
त्यांना तातडीने पालांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. रेखा यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना भंडारा येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले.
दरम्यान घटनास्थळावरून पसार दुचाकीस्वाराचा ठानेदार सुधीर बोरकुटे, अंमलदार ओमप्रकाश केवट यांनी शोध घेतला. सेवानिवृत् मुख्याध्यापक टेकराम निंबार्ते वय ६२ वर्षे ( रा. पालांदूर ) असे महिलांना धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराचा नाव आहे. पुढील तपास अमंलदार ओमप्रकाश केवट पोलीस हे करीत आहे.








