Home latest News सुकवासी जंगलात जागतीक वनदिन उत्साहात साजरा वनांचे संरक्षण सामुहिक जबाबदारी :...

सुकवासी जंगलात जागतीक वनदिन उत्साहात साजरा वनांचे संरक्षण सामुहिक जबाबदारी : वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे

83

सुकवासी जंगलात जागतीक वनदिन उत्साहात साजरा

वनांचे संरक्षण सामुहिक जबाबदारी : वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे

सुकवासी जंगलात जागतीक वनदिन उत्साहात साजरा वनांचे संरक्षण सामुहिक जबाबदारी : वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे

राजेंद्र झाडे
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
मो नं 9518368177

धाबा :- दिवसेंदिवस हवामानात होणारा बदल वातावरणात वाढलेली प्रचंड उष्णता आॅक्सीजन ऐवजी इतर वायुचे वाढलेले प्रमाण पहाता जंगल संरक्षण आणि संवर्धन हाच एकमेव उपाय दिसत असुन ही जबाबदारी सामुहीकरीतेने स्विकारण्यात यावे आम्ही समोर होतो तुम्ही मदतीला या असे आवाहन धाबा वनपरीक्षेत्रातील वनपरीक्षेत्र अधीकारी बोबडे यांनी जागतिक वनदिन कार्यक्रमात उपस्थित सयूक्त वनव्यवस्थापन पदाधिकारी व नागरीकांना केले मध्य चांदा वनविभागाच्या धाबा वनपरीक्षेत्रातील अधीकारी कार्यालया अंतर्गत सूकवासी जंगलातील कक्ष क्र 157 मध्ये गोंडपिपरी उपक्षेत्राच्या हद्दीत जागतिक वनदिनानीमीत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले उपस्थित होते यावेळी सुकवासी ..गणेशपिपरी..गोजोली..खराळपेट येथील सयूक्त वनव्यवस्थापन समीतीचे पधादीकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन क्षेत्र सहाय्यक राजू लडके यांनी केले तर आभार वनरक्षक मडावी यांनी मानले
जागतिक वनदिनानीमीत्य धाबा वनपरीक्षेत्र अधीकारी कार्यालया अंतर्गत लाठी आणि चेक पारगाव येथे दिवसा मार्गदर्शन व रात्री सांस्कृतिक जनजागृतीपर कलापथकाचे आयोजन करण्यात आल्याचे धाबा वनपरीक्षेत्र अधीकारी बोबडे यांनी सांगितले