२६ नवयुवक तरुणांनी रक्तदान करूण शहिदांना वाहिली आदरांजली
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, रक्तदान करूण करा समाजसेवा
✍ भवन लिल्हारे ✍
* भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी *
!! मीडिया वार्ता न्युज !!
8308726855,8799840838
मोहाडी :- भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका येथे आज दिनांक 23 मार्च 2022 रोज बुधवारला ‘ शहीद दिनानिमित्ताने क्रांतीवीर शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव व शहीद राजगुरू यांना भावपूर्ण आदरांजली म्हणून एआयएसएफ भंडारा व एनएसएस एन जे पटेल कॉलेज मोहाडी, शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था मोहाडी तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
त्याप्रसंगी तुमचे रक्त दुसऱ्याचे जिवन आहे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, मंदिरात जाऊन जसी ईश्वर सेवा करता तशी रक्तदान करुण समाजसेवा करा, रक्तदान हिच जनसामान्यांची सेवा, यालाच मानूया ईश्वर सेवा, रक्त हे केवळ शरीरातच तयार होते हे माहीत आहे नं? मग वाट कसली पाहताय ? चला रक्तदान करूया, दानात दान रक्तदान समाजात वाढेल आमचा मान, रक्ताला कुठंलीही जात भाषा नाही, रक्तदान करून झटकुया निराशा, रक्ताचा थेंब थेंब मनुष्याकरता वरदान उठा चला करुया रक्तदान, अशी समाजाबद्दल आपुलकी ठेऊन गुलशन प्रमोद बागडे, विश्वास उद्धव शेंडे, रजनिकांत दुधराम पवनकर, प्रशिक शांतीलाल रिनायते, महेश सुरेश सेलोकर, सागर श्रावण रंभाड, खुशलेश रमेश माटे, जितेन्द्र गिरधर कोसरे, फिरोज अण्णाजी भोंडे, करण रतन शेंडे, जयंत निशांत कोल्हे, अक्षय नरेश सोनकुसरे, विस्वास योगीराज पराते, आशिष बालिकराम बिरनवार, नमन पतिराम बुराडे, रोहीत भोजराम गाढवे, वाल्मिक मारोती बोंदरे, निखील मारोती बोंदरे, निखील व्यंकटेश्वर उईके, कुंदन छत्रुगन चरडे, अश्विन जयराम बडवाईक, शुभम निलकंठ आगाशे, रोहीत भोजराम गाढवे, रितीक मधुकर वंजारी, रुपेश जिवन साखरे, स्वप्निल लक्ष्मीकांत वंजारी, ऐशवर्या गणेश मदनकर, आशिष सुरेश साठवणे, या नवयुवक तरुण तरुणींनी सामाजीक बांधिलकी ठेऊन रक्तदान करून, आगळ्या वेगळ्या आपल्या कृतीतुन शहीदांना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून आदरांजली वाहिली, व समाजासमोर आपले आपुलकीचे उदाहरण ठेवले.