सरस्वती विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी

सरस्वती विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी

सरस्वती विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी

✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-8208166961

चंद्रपूर : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की आज दिनांक 14 /04 / 2022 रोज गुरवरला सकाळी 8 : 00 वाजता सरस्वती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भीवापुर वॉर्ड्,चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सरस्वती विद्यालयाच्या प्रिन्सिपॉल मॅडम व तथा समस्त शिक्षक वर्ग आणि सरस्वती विद्यालयातील विध्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते .
यावेळी प्रीन्सिपल सौ. स्मीता अनर्थ मैडम यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोमबत्ती प्रज्वलित केली याप्रसंगी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री बरडे सर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन श्री दुर्गे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. पुनगंटीवार सर यांनी केले .
याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले .