महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे मा. कुणाल नितीनजी राऊत यांचा पदग्रहण सोहळा २३ एप्रिल २०२२ रोजी संपन्न होणार

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे मा. कुणाल नितीनजी राऊत यांचा पदग्रहण सोहळा २३ एप्रिल २०२२ रोजी संपन्न होणार

लक्ष्य वारसा महापुरुषांचा संकल्प युवा शक्तीचा पदग्रहन समारंभ २०२२ कार्यकर्त्यांनी जास्तित जास्त संख्येत सामील होण्याचे आवाहन

मा. पवन भाऊ वंजारी जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस व मा. आकाश भाऊ वि. काकडे यांनी कार्यकत्यांना दिले आव्हाहन

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे मा. कुणाल नितीनजी राऊत यांचा पदग्रहण सोहळा २३ एप्रिल २०२२ रोजी संपन्न होणार

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

भंडारा :- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या वतीने सर्व काँग्रेस पक्षाच्या सर्व सदस्यांना असे आव्हाहन केले जात आहे की, दिनांक २३ एप्रिल २०२२ रोज शनिवारला महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे नवनियुक्त अध्यक्ष मा.श्री. कुणाल नितीनजी राऊत यांचा पदग्रहन सोहळा येत्या २३ एप्रिल २०२२ रोजी टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर (प.) मुंबई येथे २३ एप्रिल शनिवार रोजी सायंकाळी ४:०० वाजता करण्याचे योजीले आहे. तरीपण भंडारा गोंदीया नागपूर जिल्ह्यातील संपूर्ण सदस्य, सभासद, पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येत उपस्थित राहावे असे आव्हाहन जिल्हा अध्यक्ष युवक काँग्रेस मा. पवनभाऊ वंजारी, व आकाशभाऊ वि काकडे यांनी केले आहे.
यात जाने येणे व जेवनाची संपूर्ण सोय युवक काँग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे. उद्या म्हणजे दिनांक २२ एप्रिल २०२२ रोज शुक्रवारी सकाळी १०:०० वाजता लक्झरी ट्रॅवेल्स भंडारा येथुन निघणार आहे. असे आव्हाहन देखील युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मा. कुणाल नितीनजी राऊत यांनी केली आहे.
भंडारा, गोंदिया, नागपूर, जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येत सामिल व्हावे अशि अपील देखील केली आहे. जनतेचा आधार युवकांचा आवाज मा. आकाश भाऊ वि. काकडे यांनी भंडारा जिल्ह्यातील संपूर्ण तालुके व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमा प्रशंगी जास्तीत जास्त संख्येने मुंबई येथे जाण्याचा आव्हाहन केले आहे. तरी सर्व युवक काँग्रेस च्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांना उपस्थित राहायचे आहे. असे आवाहन मा. पवन वंजारी जिल्हा अध्यक्ष यांनी केले आहे. लक्ष्य, वारसा महापुरुषांचा, संकल्प युवा शक्तीचा, या उद्देशावर चालणारे सर्व कार्यकर्त्यांची जाण्याची व येण्याची व जेवणाची राहण्याची व्यवस्था देखील मुंबई येथे करण्यात आली आहे. व ज्यांना कोणाला येण्याची इच्छा असेल त्यांनी आजच संपर्क करावे अशी घोषणा देखील केली आहे. तरी आपण मा. आकाश भाऊ काकडे, व पवनभाऊ वंजारी, मो नंबर 7058209852, व 7083819845 या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती केली आहे.
चलो मुंबई चलो मुंबई हा नारा लक्षात घेता मा.श्री. कुणाल नितीनजी राऊत यांच्या खांद्याला खांदा लाऊन पक्ष मजबुती करीता संपूर्ण काँग्रेस कमीटीचे सर्व कार्यकर्ता व पदाधिकारी जास्तीत जास्त संख्येत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस पदग्रहन समारंभात उपस्थित राहावे अशी अपेक्षा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here