जीवन खूप सुंदर आहे, नेहमी हसत रहा, आनंदी रहा आणि दुसऱ्यांनाही आनंद देत रहा

जीवन खूप सुंदर आहे, नेहमी हसत रहा, आनंदी रहा आणि दुसऱ्यांनाही आनंद देत रहा

जीवन खूप सुंदर आहे, नेहमी हसत रहा, आनंदी रहा आणि दुसऱ्यांनाही आनंद देत रहा

✍ भवन लिल्हारे ✍
भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी
मीडिया वार्ता न्युज
8308726855,8799840838

लेख- समजण्याची गरज

“रशियात ९० ते ११० वर्षे वयाची १ कोटी लोक आहेत. सकाळी ५:०० वाजता उठून १० मिनीट मेडीटेशन ६ कलोमीटर फिरणे नियंत्रीत आहार… खातांना आणि बोलतांना जिभेवर नियंत्रण. दैनंदिनी निर्व्यसनी आणि आत्मविश्वास, चिकाटी व नियोजन ह्या शिदोरीवर हे रशियन औषधीची एक मात्रा / गोळी न घेता दृष्ट लागावी असे आनंदी जीवन जगत आहेत. ह्या नास्तीक मंडळींना राग / क्रोध, तिरस्कार, द्वेष आणि अहंकार काय असतो हे संसारी असूनही माहीत नाही. एका आंतरराष्ट्रीय संमेलनात एक महिना त्यांच्या सहवासात आलेल्या माझ्या सारख्या अनेकांचा हा अनुभव. त्यांच्या मते ‘क्रोध’ हा लुळा असतो. ‘राग’ हा पांगळा असतो जसे उकाड्याने शुध्द दूध नासते तसे ‘क्रोधाने’ स्नेह / प्रेम / जीवन नासते. ह्या लोकांना मी बुद्धाचे / विवेकानंदाचे / ज्ञानेश्वरीचे / रामायण / महाभारत / सर्व संतांचे तत्वज्ञान सांगितले त्यावर ह्या वयोवृद्धांनी ह्या सर्वांचा सार एका वाक्यात सांगितला. “शांतीने रागाला… नम्रतेने अभिमानाला… सरळतेने मायेला तसेच समाधानाने लोभीपणाना जिंकले पाहिजे”… राग / क्रोधावर सर्वात उत्तम उपाय म्हणजे मौन… विनय / संयमाचा त्याग केला की क्रोधाचा जन्म होतो. “नम्रतेच्या उंचीला माप नसते. ज्याने क्रोध जिंकला त्याने सर्व जग जिंकले असे समजावे.” भारतात मात्र राग / क्रोध ‘दुसर्‍यांवर’ काढायचा असतो हे ‘गृहीत’ धरले जाते. सर्वात मोठा अधिकारी आपल्या ‘सहकार्‍यांवर’ रागावतो. हे सहकारी आपल्या ‘खालच्या लोकांवर’ राग काढतात. हे लोक घरी येऊन आपल्या ‘बायकोवर’ विनाकारण राग काढतात. बायको आपल्या ‘लहान मुलांवर’ अकारण राग / क्रोध व्यक्त करते. निष्पाप मुलं चकित होऊन ते सुध्दा तो राग ‘खेळणी’ मोडून, तोडुन रडून व्यक्त करतात. म्हणुनच “भारतात सर्वात जास्त खेळणी तयार करण्याचे कारखाने आहेत.” संपूर्ण युरोपात ‘राग’, ‘क्रोध’ तर नाहीच पण दिवसभर हे इंग्रज ‘sorry.’ ‘Thank you…’ ‘Welcome’ किमान शंभरवेळा आनंदाने म्हणतात. हे लोक देवपूजा कधीच करत नाही पण चोवीस तास देशपूजा करतात. परिणामी ह्या देशावर ‘गुलामगिरी’ कधीच आली नाही. लंडन ते पॅरिस हा रेल्वेचा 790 किलोमिटरचा समुद्राखालूनचा दोन तासांचा प्रवास चालू असतांना अचानक माझ्या बोगीत दोन सुरक्षा महिला अतिशय नम्रपणे ‘sorry’ म्हणून मला बाजूला खुर्चीच्या दिशेनं बसण्याची विनंती केली. आणि मी बसलेल्या सीटवर एका मशीनद्वारे किंचित छिद्र पडलेली सीट फक्त 2 मिनिटात शिऊन स्वच्छ करून आभार मानून अगदी आनंदाने ‘Welcome’ म्हणून निघून गेल्या. भारतात आपण एस टी ने / रेल्वेने प्रवास करतो. कागद / कचरा / थुंकी टाकून / काही प्रसंगी सीट खराब करून उतरतो. आणि त्या जागी नविन प्रवाशांना Happy Journey प्रवास सुखाचा होवो म्हणुन शुभेच्छा देतो. “ही आहे गुलामगिरीत जगण्याची सवय असलेल्या भारतीयांची मनोवृत्ती.” आम्ही विमानतळावर पोहोचलो नंतर लक्षात आले की आपले मंगळसूत्र हरविले आहे. विमानतळावर तक्रार केली. एका तासात ऑटोरिक्षात पडलेले मंगळसूत्र आम्हाला अतिशय आनंदाने पोलीसांनी परत केले तेही त्यांनी ‘आमची क्षमा मागून’. कारण आमच्या देशाची तुमच्या देशात कृपया बदनामी करु नये ह्या एकच अपेक्षेने… आपण भारतीय खूप हट्टी. “हट्ट ही क्रोधाची बहिण.” ती सदैव मानवासोबत असते. क्रोधाच्या पत्नीचे नांव ‘हिंसा’. ती सदैव लपलेली असते. अहंकार क्रोधाचा ‘मोठा भाऊ’. निंदा / चुगली ह्या क्रोधाच्या ‘आवडत्या कन्या’. “एक तोंडाजवळ दुसरी कानाजवळ.” वैर हा क्रोधाचा ‘सुपुत्र.’ घृणा ही ‘नात.’ अपेक्षा ही क्रोधाची ‘आई.’ हर्षा (आनंदी) ही आपल्या परिवारातील ‘नावडती सुन.’ तिला ह्या परिवारात स्थानच नसते. प्रत्येक भारतीय हा ह्या परिवाराचा पारंपारिक घटक… परिवार त्याला सोडत नाही… त्याला परिवाराला सोडवत नाही.
“अहंकार सुखाने वाढतो… दुःखाने कमी होतो…” “अहंकारी (भारतीय) दुबळा असतो”… दुबळे (ते वयोवृद्ध रशियन) अहंकारी नाहीत…

जीवन खूप सुंदर आहे. नेहमी हसत रहा, आनंदी रहा आणि दुसर्‍यांनाही आनंद देत रहा. लेख आवडला तर नक्कीच मीडिया वार्ता न्युज ला लाईक करा. धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here