रानवडी बु.रा.जि.प.शाळेला चक्रीवादळाचा तडाखा ग्रामस्थांची नुकसान भरपाईची मागणी
✍ सखाराम साने ✍
पोलादपूर तालुका प्रतिनिधी
मो.९२०९४८३५८३
पोलादपूर(रायगड):-पोलादपूर तालुक्यामध्ये गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळत असताना रानवडी बु.येथील रायगड जिल्हा परिषद शाळेला मोठा फटका बसला असून शाळेचे आतोनात नुकसान झाले आहे परंतु काही दिवसांवर शाळेला सुट्टी पडणार असल्याने पावसाळ्यापूर्वी शाळेचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे अन्यथा शाळेच्या भिंती सुद्धा पडण्याची दाट शक्यता आहे अशा प्रकारची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे यावेळी गट शिक्षणाधिकारी पोलादपूर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता नागरिकांनी त्यांच्याकडे व्यथा मांडल्या.