नवेगाव हुंडेश्वरी येथे वाघाच्या हल्ल्यात इसम ठार*तेंदुपत्ता संकलन करण्यासाठीं गेला होता जंगलात

अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
9403321731
नागभिड– नागभीड तालुक्यात तेंदूपत्ता संकलन गोळा करण्याचे काम सुरू आहे .तेंदूपत्ता संकलन करून ग्रामीण भागातील जनता पैसा गोळा करीत असते. त्यासाठी हिस्त्र प्राणी च्या जंगलात लोकांना जावे लागते .आज दिनांक ५/५/२०२२ ला नागभीड तालुक्यातील नवेगाव हुंडेस्वरी येथील श्री अडकू मारुती गेडाम वय 55 वर्ष सकाळी सात वाजताच्या दरम्यान तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गोवरपेठ येथील कक्ष क्रमांक ७४२ येथे गेले असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढवून त्याला जागीच ठार केल्याची घटना आज घडली.
नेहमीप्रमाणे आडकुजी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातू ,नाती असा आप्त परिवार आहे. तालुक्यात वाघाचे संभाव्य धोके लक्षात घेता संबंधित विभागाने नरभक्षक वाघाला त्वरित बंद करावे तसेच गेडाम परिवाराला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गाव परिसरातून होत आहे.








