मुंबई गोवा महामार्गावर आयशर टेम्पो आणि एस टी मध्ये अपघात २ जखमी

मुंबई गोवा महामार्गावर आयशर टेम्पो आणि एस टी मध्ये अपघात
२ जखमी

मुंबई गोवा महामार्गावर आयशर टेम्पो आणि एस टी मध्ये अपघात २ जखमी

✍ रेशमा माने ✍
महाड शहर प्रतिनिधी
८६००९४२५८०

महाड : – मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी ३:५० वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत एस टी आणि एका आयशर टेम्पो मध्ये सामोरा समोर धडक झाली .या अपघातात एस टी चालक आणि एक प्रवासी जखमी झाला.
उन्हवरे मुंबई , दापोली मधून १:३० वाजता सुटलेली एम .एच .२० बी एल १७०५ एस टी महाड तालुक्यातील दासगाव गाव हद्दीत ३:५० वाजण्याच्या सुमारास आल्या नंतर मुंबई ते महाड दिशेला जाणाऱ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच .४६ बी एम ८८१६ याने समोरून जोराची धडक दिली .एसटी मध्ये २३ प्रवासी होते सुदैवाने वाचले मात्र एसटी चालक पाडस अशोकराव कबनुरकर ३३ राहणार नांदेड आणि एक प्रवासी धनराज अप्पा कांबळे ३५ राहणार कोल्हापूर असे दोन जण जखमी झाले .जखमी वर दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये उपचार करण्यात आले.