श्री संताजी जगनाडे महाराज 13 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न सगुण हा घाणा घेऊनी बैसलो! तेली जन्मा आलो घाणा घ्याया!!निदंक हा घाणा म्हणावा जरी!शुभ कार्या आधी भरतात!!

श्री संताजी जगनाडे महाराज 13 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

सगुण हा घाणा घेऊनी बैसलो! तेली जन्मा आलो घाणा घ्याया!!निदंक हा घाणा म्हणावा जरी!शुभ कार्या आधी भरतात!!

श्री संताजी जगनाडे महाराज 13 वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न सगुण हा घाणा घेऊनी बैसलो! तेली जन्मा आलो घाणा घ्याया!!निदंक हा घाणा म्हणावा जरी!शुभ कार्या आधी भरतात!!

 

किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

माणगाव(रायगड):- श्री. संताजी जगनाडे महाराज 13 वा वर्धापन दिन सोहळा रविवार दि. 22/5/22 रोजी ऊसर बुद्रुक ता. माणगाव येथे संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी मा.श्री. गजानन (नाना) शेलार कोषाध्यक्ष- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, मा.श्री. भूषणजी कर्डिले महासचिव- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, मा.श्री. सतीशजी वैरागी अध्यक्ष- महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, श्री.गणेशजी धोत्रे कोकण विभाग अध्यक्ष म.प्रां.तै.महासभा, श्री.गणेशजी महाडीक रायगड जिल्हा अध्यक्ष म.प्रां.तै.महासभा, श्री.संतोष पोटे कार्याध्यक्ष रा.जि.तै महासभा, श्री.सिद्धांत शेलार युवा अध्यक्ष रा.जि.तै महासभा, श्री.प्रथमेश काळे युवा सचिव रा.जि.तै महासभा, श्री.सुनिलजी चौधरी ठाणे, श्री.अजित तार्लेकर नगरसेवक माणगाव नगरपंचायत, श्री.सुनील राऊत उद्योजक पाली, मा.हरिश्चंद्र महाडिक प्रसिद्धी प्रमुख म.प्रां.तै.महासभा, श्री.संतोष भोज उपाध्यक्ष रा.जि.तै.महासभा, श्री. गजानन शेलार उपाध्यक्ष कोकण विभाग म.प्रां.तै.महासभा, श्री.संतोष रहाटे अध्यक्ष रा.जि.को.ते.स.सं, श्री. विनायक तार्लेकर सल्लागार रा.जि.को.ते.स.सं, श्री.जितेंद्र लोखंडे अध्यक्ष पेण तालुका, श्री. रवींद्र निगडे अध्यक्ष म्हसळा-श्रीवर्धन, श्री. किशोर किरवे अध्यक्ष महाड-पोलादपूर, सह श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर कमिटी व सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी श्री सत्यनारायणाची पुजा, प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते श्री संताजी जगनाडे महाराज पादुका मिरवणूक सह पालखी सोहळा, महाप्रसाद, प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार समारंभ, महिलांचा हळदी कुंकू समारंभ, सुस्वर भजन ऊसर बुद्रुक ग्रामस्थ मंडळ, अशाप्रकारे कार्यक्रम आनंदी आनंदात पार पडला यावेळी प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत समाज एकत्र येणे काळाची गरज आहे तसेच ओबीसी आरक्षण सुद्धा गरजेचे आहे यासाठी सर्व समाज बांधवांनी लढा देणे गरजेचे आहे तसेच ज्याच्या बरोबर तेली तो भाग्यशाली जगात नंबर वन चा नेता व भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी सुद्धा तेली असल्याचे अभिमान असून आम्ही किती भाग्यशाली आहोत हे समजण्या पलीकडचे आहे अशाप्रकारे तेली समाजाची मैदान मुलुख तोफ गजानन नाना शेलार व भूषणजी कर्डिले यांनी समाज बांधवांना संबोधित केले डाॅ.श्री. सतीशजी वैरागी साहेब यांनी श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरासाठी पंचवीस हजार रुपये ची आर्थिक मदत केली असून समस्त तेली समाज बांधवांकडून त्यांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here