माणगांव तालुक्यात चोराचा धुमाकूळ अमित कॉम्प्लेक्स येते ६१,५०० रुपयांची चोरी
सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१
माणगांव : – माणगाव मध्ये घरफोडी चोरट्यांचा धुमाकूळ दिनांक 12 मे 2022 बावीस रोजी सकाळी बाराच्या सुमारास ते 23 मे 2022 रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अंकुश किसन काळे वय वर्ष 45 राहणार अमित कॉम्प्लेक्स निजामपुर रोड रूम नंबर 104 पहिला मजला मुळगाव बोरी खुर्द जुन्नर पुणे यांच्या राहत्या घरी एका अज्ञात चोरट्याने बंद असलेला घराचा दरवाजा लॅच तोडून आत प्रवेश करून घरातील एक सोन्याची अंगठी दहा ग्रॅम वजनाची त्यावर A असे लिहिलेले एक सोन्याचे लॉकेट त्यावर ओम असे कोरलेले व एक चांदीची साखळी आणि पाचशेच्या 30 नोटा असा एकूण मुद्देमाल 61 हजार 500 रुपयांचा या चोरट्याने स्वतःच्या फायद्याकरता व लबाडी करता चोरून चोरटा फरार झाला याची खबर अंकुश काळे यांनी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील करीत आहेत