महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण.

सचिन पवार माणगांव तालुका प्रतिनिधी ८०८००९२३०१

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पेणच्या रेल्वे स्टेशन जवळील रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे नागरीकांच्या जीवाशी अक्षरशः खेळ होत होता. या विषयी आवाज उठवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पेण तालुका अध्यक्ष श्री. रुपेश पाटील यांच्या नेतृत्वात प्रशासनाला आणि सबंधीत लोकांना ठणकावलं होतं कि, लवकरात लवकर ही खडी रस्त्यावरुन हटवा आणि रस्त्याचे डांबरीकरण करा.

त्यानंतर दोन ते तीन दिवसांतच प्रशासनाने पडलेली खडी हटवून डांबरीकरण केले. डांबरीकरणा नंतर मनसेने प्रशासनाचे आभार मानले.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण पेण तालुका अध्यक्ष श्री. रुपेशदादा पाटील, महिला सेनेच्या जिल्ह्या अध्यक्षा सौ. सपनाताई राऊत, पेण शहर महिला अध्यक्षा निकिता पाटील, महिला तालुका सचिव सौ. रेखा तांडेल, पेण शहर उपाध्यक्ष महिला गौरी ओरा, पेण तालुका उपाध्यक्ष श्रीराम पाटील, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here