शेनाटे येथे पुर्व वैमनस्या च्या रागातून एकास जबर मारहाण,जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यु.

शेनाटे येथे पुर्व वैमनस्या च्या रागातून एकास जबर मारहाण,जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यु.

शेनाटे येथे पुर्व वैमनस्या च्या रागातून एकास जबर मारहाण,जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यु.

नजीर पठाण तला तालुका प्रतिनिधी

88882 61021

तळा:तालुक्यातील शेनाटे येथे पुर्व वैमनस्य च्या भांडणाच्या रागातून एकास जबर मारहाण करण्यात आली असून जखमीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की शेनाटे येथील दिनेश बटावले हे रिक्षातून तळा येथे येतअसताना मौजे खांबवली गावच्या स्मशान भूमीजवळ आरोपी रुपेश बटावले व गणेश बटावले हे अचानक रिक्षाच्या समोर येऊन त्यांनी मागील भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ करीत दिनेश बटावले हे बसलेल्या रिक्षाची समोरील काच दगड मारून फोडली.तसेच रिक्षा चालक बाहेर पडल्यानंतर दोन्ही आरोपींनी दिनेश बटावले यांना बाहेर काढून हाता बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी दिनेश बटावले यांना जवळच असलेल्या स्मशानभूमीजवळ ढकलत घेऊन जात त्यांना खाली पाडले व दोन्ही आरोपींनी मोठमोठ्या दगडांनी त्यांच्या उजव्या पायावर मारून पाय मोडला शिवाय डोक्याला देखील गंभीर दुखापत करून दमदाटी केली व तेथून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी घटनास्थळी धाव घेतली.जखमीला तातडीने तळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असता दुखापत गंभीर असल्याने जखमीला मुंबई येथील सायन रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारादरम्यानच दिनेश बटावले यांचा मृत्यू झाला. असल्याने वेगळा चर्चेला विषय होत आहे बाबत तळापोलिस ठाण्यात आरोपीं गु.र.नं.४८/२०२२भा.द.वि.सं.कलम ३२६,४२७,३२३,५०४,५०६.३४ प्रमाणे दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हवालदार आर.बी.बांन्द्रे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here