रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अल्पसंख्याक आघाडी कडून ईद मिलन समारोह मोठ्या थाटात संपन्न
✍मनोज एल खोब्रागडे✍
सह संपादक मीडिया वार्ता न्यूज
मोबाईल नंबर-8208166961
पुणे : – सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्याक आघाडी पुणे च्या वतीने कोरेगाव येथे शुक्रवार दिनांक 03/06 2022 ला सायंकाळी5 वाजता मौलाना अब्दुल कलाम आझाद हॉल बर्निंग घाट कोरेगाव पार्क येथे ईद मिलन समारोह मोठ्या उत्साहात व थाटात संपन्न झाला या ईद मिलन समारोहाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले माननिय नामदार रामदास आठवले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार व माननीय खासदार गिरीश जी बापट यांची प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडण्यात आला तसेच या ईद मिलन समारोहाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय ऍडव्हकेट अय्यूब शेख प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्याक आघाडी यांनी आपली प्रामुख्याने उपस्थिती दर्शवली होती .
हा ईद मिलन समारोह प्रमुख पाहुण्याच्या व अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या शांततेत व मोठ्या ताटात संपन्न झाला या कार्यक्रमात प्रमुख उपस्थित पाहुण्यांमध्ये मा. रफीकभाई दफेदार अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडी आणि राजाभाऊ सरोदे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश,मा आसिफभाई शेख सामाजिक कार्यकर्ते,जगदीश मुळीक अध्यक्ष भाजपा पुणे शहर, मा. सुनील जी कांबळे आमदार पुणे कँटो ,मा पी. ए . इनामदार शिक्षण महर्षी,शिवानंद हुळ्यालकर मा. मंत्री ,मौलाना कारी तैय्यब ,मौलाना मोहम्मद सादिक यांचे स्वागत माननीय स्वागताध्यक्ष मा.वसीम पहिलवान अध्यक्ष पुणे शहर अल्पसंख्याक आघाडी यांनी केले तर या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढविणारे बाळासाहेब जानराव ,मा.आसित गांगुर्डे, मा .परशुराम वाडेकर, मा.निलेश आल्हाट, मा.संजय सोनवणे, मा .हिमालिताई कांबळे, मा.यशवंत नडगम ,मा.श्याम गायकवाड, मा.शशिकलाताई वाघमारे ,मा.सुन्नवी आपा शेख,मा.माहीपाल वाघमारे ,मा.श्याम सदाफुले मा.जयंत रणदिवे हे उपस्थित होते तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मोलाची भूमिका बजावली ते फिरोज खान ,इरफान शेख, सोहेल काजी, रेहान सय्यद,सीमा साबळे ,आसा शेख ,झहीर भालदार, नदीम मेमन , स्वप्नील गायकवाड, आमन शेख ,राहुल राज,संदीप धांडोरे , मुकेश काळे,अक्षय गायकवाड, रवींद्र बनसोडे यांनी अथक परिश्रम घेतले .