Home latest News महाड येथे संत निरंकारी मिशनने केली 1 हजार वृक्षांची लागवड वृक्षारोपण सारख्या...

महाड येथे संत निरंकारी मिशनने केली 1 हजार वृक्षांची लागवड वृक्षारोपण सारख्या मोहिमेची नितांत गरज-झोनल इन्चार्ज प्रकाश म्हात्रे

75

महाड येथे संत निरंकारी मिशनने केली 1 हजार वृक्षांची लागवड
वृक्षारोपण सारख्या मोहिमेची नितांत गरज-झोनल इन्चार्ज प्रकाश म्हात्रे

महाड येथे संत निरंकारी मिशनने केली 1 हजार वृक्षांची लागवड वृक्षारोपण सारख्या मोहिमेची नितांत गरज-झोनल इन्चार्ज प्रकाश म्हात्रे

✍ किशोर किर्वे ✍
महाड तालुका प्रतिनिधी
मो.९५०३०००९५९

महाड(रायगड):-सध्या आपली पृथ्वी ग्लोबल वार्मिंगच्या संकटाला तोंड देत आहे अशावेळी आपल्याला पर्यावरणाचा समतोल साधता यावा यासाठी वृक्षारोपणासारख्या मोहिमेची नितांत गरज आहे जेवढे अधिक वृक्ष लावू तेवढीच अधिक ऑक्सिजनची निर्मिती होईल आणि तेवढीच शुद्ध हवाही प्राप्त होईल. ज्याप्रमाणे वननेस-वन चे स्वरूप अनेकतेत एकतेचे दृश्य प्रस्तुत करते तद्वत मानवानेही शांतीपूर्ण सह-अस्तित्वाच्या भावनेने एकोप्याने राहून जगाचे सौंदर्य वाढवण्याची गरज आहे
उपरोक्त उदगार रायगड 40-अ व चिपळूण झोनचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे यांनी महाड एमआयडीसी येथील एम्बायो लिमिटेड कंपनीच्या दीड एकर जमिनीमध्ये संत निरंकारी मिशन व एम्बायो लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उद्घाटन सोहळा प्रसंगी काढले सन 2020 पासून कोरोना संकटाने आपल्या सर्वांनाच प्रकृतीची अनमोल देणगी असलेल्या प्राणवायूचे म्हणजेच ऑक्सिजनचे महत्व काय आहे ते चांगले शिकवले आहे. शिवाय त्याच्या उणिवेमुळे उत्पन्न होणाऱ्या दुष्परिणामांशीही आम्हाला अवगत केले आहे. आपल्याला हे ध्यानात ठेवायला हवे, की मानवी शरीरामध्ये जिवंतपणा असल्याचे प्रतीक हा प्राणवायूच आहे जो आपल्याला या वनश्रीपासून प्राप्त होतो असेही ते म्हणाले उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर झोन रायगड 40-अ व चिपळूण झोनचे झोनल इंचार्ज प्रकाश म्हात्रे, रायगड क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील, एम्बायो लिमिटेडचे ऑपरेशन चीफ मॅनेजर आर के गीते, हेड प्रोडक्शनचे ए जी स्वामीनाथन व एम्बायो कंपनीचे इतर विविध विभागाचे मॅनेजर तसेच संत निरंकारी मिशनच्या महाड सेक्टरचे संयोजक दयाळ पारधी, बिरवाडी ब्रँच मुखी विठ्ठल कंक, सेक्टर मधील ब्रँचचे सर्व मुखी, प्रबंधक तसेच सेक्टरमधील सर्व सेवादल युनिट अधिकारी तसेच सेवादल व साधसंगत, एम्बायो लिमिटेडचे कर्मचारी मोठ्या संख्येने वृक्षारोपण कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी एम्बायो लिमिटेडचे आर के गीते तसेच ए जी स्वामीनाथन यांनी निरंकारी मिशनच्या सामाजिक व आध्यात्मिक कार्याबद्दल विशेष गौरवोदगार काढून संत निरंकारी मिशन अध्यात्मिक प्रबोधन यासह मानवतेच्या सेवेसाठी समर्पित होऊन कार्य करत असल्याचे उदगार त्यांनी काढले. व वृक्षारोपण उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल निरंकारी मिशनचे विशेष आभार मानले. तर संत निरंकारी मिशन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या थीमवर 2014 पासून जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहे. सध्या निरंकारी मिशन ही देशातील अग्रगण्य स्वयंसेवी रक्तदान संस्थांपैकी एक आहे. 1986 पासून आतापर्यंत 7225 रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असून 12 लाख युनिट रक्तदान करण्यात आले आहे. असे सूत्रसंचालन करताना महाड सेवादल युनिट शिक्षक अनिल सकपाळ यांनी सांगितले. वृक्षारोपण केलेल्या 1 हजार वृक्षांमध्ये वड, पिंपळ, गुलमोहर, बदाम, निव, अशोक, जांभूळ, करंज आदींचा समावेश होता.