Home latest News अंधाराच्या कविता

अंधाराच्या कविता

223

सांज सरून रात्रीकडे निघतो जेव्हा सूर्य
अंधार मनांत दाटतो
माणसाला माणूस दिसू नये का? ह्या युगांत
युगानुयुगांचं काल्पनिक काळपनं
घरं करून बसलंय आंतरकाळजात
भयाण शांतता
शांततेत ऐकायला येणारा “अपराधी” आवज
झोप उडवून लावतो
त्या घुबड बसलेल्या झाडांकडे
मग.…एकटक बघत बसतो
स्वतःच अस्तित्व
तपासणी करतो जिवंत असण्याची

त्या रात्रीला डोळे फुटलेच नाही अजून.…
_____●●●____●●●____●●●____
मिलिंद सुमन अशोक दामोदरे