मुलाखत घेणार्यानी
तपासली पाहिजे त्यांची अंतःकरणे
त्यांच्या मेंदूला सलाम करणारा मी?
अन
माझ्यासारखे असंख्य अंधारात असलेली माणसे
डोळे बंद करून “विश्वासार्हता”ओवाळून टाकतात
लोकशाहीच्या चौथ्या खांबावर…!
माझ्या मनपटलावर बिंबवली जातात
त्यांनी ठरवलेली ठराविक वृत्ते
मी बनत जातो-बनवला जातो मानसिक गुलाम
त्यांची तिजोरी भरली जाते
नोटांच्या कागदांनी…!
वॉर रूम मध्ये बसवली जातात
बोलून घेतलेली पोपटे
त्यांना बोलण्याची मुभा
बाकीचे फकस्त बघ्याची भूमिका
कारण,त्यांना बोलण्याची संधी/नसतेच अजिबात !
(कोणत्या तुटलेल्या पायाने त्यांना लाथ मारावी)
मिलिंद सुमन अशोक दामोदरे








