दी अण्णासाहेब सावंत महाड बँकेचा मनमानी कारोभार

दी अण्णासाहेब सावंत महाड बँकेचा मनमानी कारोभार

दी अण्णासाहेब सावंत महाड बँकेचा मनमानी कारोभार

सचिन पवार
माणगांव तालुका प्रतिनिधी
८०८००९२३०१

माणगांव :- माणगांव तालुक्यातील शाखा माणगांव दि अण्णासाहेब सावंत महाड बँकेचा मनमानी कारोभार गेल्या दोन वर्षांपासून थकलेल्या कर्जदारान कडून दुपट थिपट अधिक व्याजदर लावून त्याच्या कडून धमकी देऊन हफ्ते वसूल करताना पाहायला मिळत आहेत.

कोव्हीड सक्रमक चालू झाल्या पासून सर्व जनता घरी बसली होती त्यामुळे कर्जदार यांना कोणताही आपला हफ्ता भरता येत नव्हता परंतु आता कुठे कोव्हीड नंतर कर्जदार कामाला चालू नाही होत तर बँक तसेच फायनान्स वाले आप आपली पावले उचलायला लागलेत एकदा कर्जदार जर का त्याच्या जवळ रिक्वेस्ट करून जर बोलत असेल तर त्याला अपशब्द तसेच शिवीगाळ करून भेडसंवाद आहेत. तसेच त्याच्या घरी जाऊन त्याच्या बायका मुलांनपाशी नको नको ते अब्रू विषयी शब्द बोलत आहेत. तर यांना करायचं काय असं प्रश्न चिन्ह दिसत आहे.दि अण्णा साहेब बँकेचे शिपाई कर्मचारी जितेंद्र जाधव तसेच त्याच सहकारी जो कोणी कर्जदार दिसेल त्याला आपलं बँकेचे हप्ते थकीत आहे ते भरायला चालू करा असं प्रेमानं न सांगता मोठया आवाजात तसेच शिवीगाळ करून बोलत आहेत,एखाद्या कर्जदारचं ३० हजार किंवा ५० हजार किंवा अधिक कर्ज थकीत असेल त्याच्या दुपट व्याज लावून ठेवलं आहे तसेच लॉक डाऊन च्या काळात दोन वर्ष तुम्ही हफ्ते भरले नाही त्याच व्याज लावल आहे असं सांगण्यात येत आहे. एकादा कर्जदार बँक मॅनेजर जवळ आम्हाला एक महिन्याचे कालावधी द्या आम्ही तुमच बँक कर्ज नियमित भरू आमच्या कामाची गाडी आता चालू झाली आहे तसेच लॉक डाऊन मुळे आम्ही घरी बसून राहिलो त्याच प्रमाणे आम्हाला काम धंदा मिळत नव्हता त्यामुळे आम्ही आपले बँक हफ्ते भरू शकलो नाही असे बोलून सुद्धा ऐकायला तयार नाही आहेत उलट मोठया आवाजात बोलून तुम्ही तिकडे झक मारा आणि बँकेची जितकी राखम सांगितले आहे ती आज च्या आज भरून ठाका.असं तगादा लावलं जात आहे.

दि अण्णासाहेब सावंत कॉ ऑफरिटिव्ह बँक महाड शाखा माणगांव या बँकेचा तगादा मॅनेजर तसेच शिपाई असेच करणार आहेत का आणि कुठं पर्यंत लोकांची लूटमार चालू राहणार असं स्थानिक कर्जदार बोलत असल्याच पाहायला मिळत आहे. या बँकेच्या कर्मचारी तसेच मॅनेजर याच्या वरती कायदेशीर कारवाई करावी अशी कर्जदाराची मागणी आहे. आम्ही बँकेचे कर्ज भरण्यासाठी तयार आहोत पण तुम्ही २० हजार १५ हजार आता लगेच भरावे लागतील तर ते लगेच मिळणार नाही ज्या प्रमाणे आम्ही आमचे रेगुलर हफ्ते भरीत होतो तसेच आमचे राहिलेले अम्माऊंट जितकी आहे तितकीच भरणार आणि तुम्ही जी लॉक डाऊन च्या काळात आमच्या रक्कमे वरती जी भरम साठ व्याज लावला आहे तो आम्ही भरणार नाही असं कर्जदार कडून वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महाड बँकेचे कर्मचारी यांनी जो आमच्या घरात येऊन आमच्या बायकांना उलट सुलट तसेच त्याच्या इजती बद्दल बोलत आहेत त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी कर्जधाराची आहे.