भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम.

✍तन्मय सुनिल जैन ✍
सोयगाव तालुका प्रतिनिधी
7588165274

सोयगाव : – भाजपा अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे लाडके प्रदेश अध्यक्ष,तसेच भाजपा महाराष्ट्र चे प्रदेश प्रवक्ते सन्माननीय हाजी इजाज भाई देशमुख साहेब यांच्या जन्म दिवसानिमित्त भाजप महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक मोर्चा युवा च्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम सर्व पदाधिकारी यांच्या वतीने घेण्यात आला . तसेच साहेबांच्या जन्मदिवसानिमित्त प्रत्येक कार्यकर्त्याने कमीत कमी 10 झाडे लावायचा निर्धार केला होता. त्याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष श्री फारुक आसिफ पटेल यांनी साने गुरुजी मराठी शाळा अकोट येथे तर लीडर सरफराज यांनी हजरत मन्सूर बाबा चौक येथे,तसेच नरिमन पॉइंट येथे भरत राऊत समवेत अनेक पदाधिकाऱ्याने वृक्षारोपण केले.
संपूर्ण महाराष्ट्रात काल कृषिदिनाचे औचित्य साधून एजाज भाई यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम पार झालेत
या कार्यक्रमाचे आयोजन श्री अब्दुल खालेद रशीद प्रदेश युवा प्रमुख,जितेंद्र सुभाष जैन प्रदेश उपप्रमुख,तसेच तन्मय सुनिल जैन प्रदेश संयोजक सोशल मीडिया यांच्या वतीने करण्यात आला होता.